शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

परिस्थितीशी संघर्ष हेच ‘बंदा रुपया’चं रहस्य! - माधुरी पवार- संडे स्पेशल मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:57 IST

आपल्या परिस्थितीचं भांडवल करून लोकांकडून करुणा मिळविण्यापेक्षा कणखर होऊन ध्येय गाठण्याची तयारी असणं महत्त्वाचं आहे. सगळं असलं म्हणून तुम्ही यशस्वी होत नाही आणि काही नाही म्हणून तुम्ही पराभूतही होत नाही! - माधुरी पवार

ठळक मुद्देसर्वाधिक फेटे अन् पाहणाऱ्यांची पसंती--पाया बाबा... कळस ओंकार!

प्रगती जाधव-पाटील ।‘विविध ठिकाणी होणाऱ्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सातारकरांनी प्रवेश मिळविला, अंतिम फेरीपर्यंत धडकही मारली; पण जेतेपदाच्या मुकुटापर्यंत पोहोचता-पोहोचता त्यांना परतावं लागलं. पण माजगावकळ माळावरील माधुरीने स्वप्नवत वाटावं असं काम करून साताºयाच्या कलाक्षेत्रात मानाचा तुरा रोवला. राज्यातील शेकडो स्पर्धकांना मागे टाकून ‘अप्सरा आली’ या स्पर्धेतून तिनं बंदा रुपया ’असल्याचं परीक्षकांचं मत खरं केलं. सातारा ते मुंबईचा कला मंच हा माधुरीचा प्रवास, यातील मोठे अडथळे आणि सातारकर असल्याची जमेची बाजू याविषयी ती ‘लोकमत’शी दिलखुलास बोलली...!

प्रश्न : निमशहरातून महानगरांतील स्पर्धकांशी स्पर्धा कशी होती?उत्तर : महानगरांमधील मुलींना बरंच काही शिकायला मिळतं. नृत्याबरोबरच त्या स्टंटही करण्यात तरबेज होत्या. मला हे जमत नव्हतं; पण शिकण्याची तयारी होती. त्यानुसार मी शिकले. पण माझ्याकडे चेहºयावरच्या हावभावाच्या कलेने मला सर्वात सरस ठरवलं. त्या शरीराने नृत्य करायच्या आणि माझा नृत्याविष्कार दाखवायचा, आमच्यातील हाच फरक मला जेतेपदापर्यंत घेऊन गेला.

प्रश्न : या पूर्ण प्रवासात ‘सातारकर’ म्हणून काय बळ देणारं ठरलं?उत्तर : सातारकर म्हणून आपल्याकडे लढावू वृत्ती आहे. सुमारे साडेचार महिने मी बाहेरच्या जगापासून अगदी लांब होते. तिथले शेड्यूल, बारा तासांचा सराव, शूटिंग या सगळ्यात अनेकदा नैराश्य यायचं; पण सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांची येणारी पसंती, त्यांच्या कमेंटस् बरंच बळ देऊन जायच्या. सातारकर म्हणून प्रत्येकाने माझ्या पाठीशी ठाम उभं राहणं आणि प्रोत्साहन देणं हेच सातारकर असल्याचं वैशिष्ट्य असल्याचं मी मानते.

प्रश्न : नाक फ्रॅक्चर होईपर्यंतच नृत्य तल्लीनता कशामुळे?उत्तर : ‘दुर्गाई माझी, गौराई माझी’ या गाण्यावर नृत्य करताना भक्त आणि देवी अशा दुहेरी भूमिकेतून मी नृत्य करत होते. शेवटच्या दोन सेकंदात नृत्य कलेविषयी आपण देवाच्या चरणी लिन होऊन त्याचे आभार मानावेत, अशी सुप्त इच्छा जागृत झाली आणि मी त्या तल्लीनतेतच स्वत:ला देवाच्या चरणी झोकून दिलं. स्टेजवर पडले तेव्हा सर्वांना नृत्याविष्कार वाटला. नंतर मात्र नाकाला प्लास्टर करून सराव करावा लागला.गळक्या घराची लाज नाहीच !माधुरीचे वडील जोतिराम आणि आई कल्पना हे दोघेही हंगामी कामगार. कधी गवंडी म्हणून तर कधी रस्त्याच्या कामाला ते जात. डोक्यावर छत म्हणून असलेलं घर पावसाळ्यात गळायचं. या गळक्या घरात राहून माधुरीनं तिचं शिक्षण पूर्ण केलं. वडिलांबरोबर नृत्य करण्याचं तिचं पहिलं स्टेजही हे घरच होतं. त्यामुळे या घराविषयी तिला आत्मीयता वाटते. आयुष्यात कितीही मोठी झाले तरीही गळक्या घराची मला कधीच लाज वाटणार नाही, असं ती सांगते.पाया बाबा... कळस ओंकार!माधुरीच्या आयुष्यात नृत्याचा प्रवेश झाला तो वडिलांच्या रुपाने. वडिलांचे नृत्य बघून माधुरीही ते शिकत गेली. चालायला शिकलेल्या माधुरीला पायावर घेऊन ‘हस्ते हस्ते रोना सिखो, रोते रोते हसंना’ या नृत्यावर ती पहिल्यांदा बाबांबरोबर नाचली. त्यानंतर घरातच कधी तरी वडिलांबरोबर दिलखुलास नाचणं झालं. वडिलांबरोबर स्पर्धा ती गाजवू लागली. माझ्या करिअरचा पाया माझ्या बाबांनी घातला तर ते कळसापर्यंत नेण्याचं काम पती ओंकार याने केल्याचे माधुरी सांगते.

टॅग्स :danceनृत्यFamilyपरिवार