शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जखीणवाडीत संघर्ष; पण सत्ता अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:37 IST

मलकापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत जखीणवाडीमध्ये पक्षीय पातळीवर, तर नांदलापूरसह चचेगावात भावकी आणि गावपातळीवरील राजकारणाची सरशी झाली. जखीणवाडीत चव्हाण-उंडाळकर गटाने ...

मलकापूर : ग्रामपंचायत निवडणुकीत जखीणवाडीमध्ये पक्षीय पातळीवर, तर नांदलापूरसह चचेगावात भावकी आणि गावपातळीवरील राजकारणाची सरशी झाली. जखीणवाडीत चव्हाण-उंडाळकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. नांदलापुरात दोन माजी सरपंचांच्या गटाला झुकते माप देत मतदारांनी पुन्हा संधी दिली, तर चचेगावात पूर्वीप्रमाणेच उंडाळकर-भोसले गटाला यश मिळवता आले.

कऱ्हाड तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या जखीणवाडीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोधाला फाटा देत सर्व ११ जागांवर निवडणूक झाली. ऐनवेळी उदयसिंह पाटील व पृथ्वीराज चव्हाण गटात समेट होऊन उंडाळकर गटाच्या सर्व उमेदवारांनी आपली उमेदवारी काढून घेतली. त्यामुळे चव्हाण-उंडाळकर विरुद्ध भोसले गटातच मुख्य लढत झाली. या चुरशीच्या लढतीत रामचंद्र पाटील व अ‍ॅड. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ११ पैकी ७ जागा जिंकत अनेक वर्षांपासूनची सत्ता अबाधित ठेवली. विरोधी डॉ. अतुल भोसले गटाला ४ जागा मिळाल्या.

चचेगावात अकरा जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत पक्षीय पातळीला महत्त्व न देता गावपातळी व भावकीला प्राधान्य मिळाले. उंडाळकर व भोसले गटाने एकमेकांच्या हातात हात घालून निवडणूक लढवली. या निवडणुकीत उदयसिंह पाटील-उंडाळकर गटाला ३, डॉ. अतुल भोसले गटाला ४, तर आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला ४ जागा जिंकता आल्या.

नांदलापूर ग्रामपंचायतीत ९ सदस्य संख्या असून, अशोकराव थोरात यांना मानणाऱ्या गोपाळ वस्तीमधील एक महिला अर्ज माघारीच्या मुदतीत बिनविरोध निवडून आली होती. उर्वरित ८ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत नांदलापुरात वरिष्ठ नेत्यांच्या पक्षीय राजकारणाला बगल देत भावकी व गावपातळीवरील राजकारणाला प्राधान्य दिले गेले. विलास शिर्के, मानसिंग लावंड व प्रदीप शिर्के या माजी सरपंचांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. या आठ जागांपैकी विलास शिर्के यांना ३, मानसिंग लावंड यांना ३ व प्रदीप शिर्के यांना २ जागांवर विजय संपादन करता आला.

- चौकट

नांदलापुरात सत्ता कुणाची?

नांदलापुरात मानसिंग लावंड व प्रदीप शिर्के हे उंडाळकर व चव्हाण यांना मानतात, तर विलास शिर्के यांच्यासह बिनविरोध निवडून आलेले डॉ. अतुल भोसले यांचे नेतृत्व मानतात. हे चित्र पाहता नांदलापुरात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मानणाऱ्या गटाची सत्ता येईल, असे चित्र आहे. मात्र, सरपंच आरक्षण सोडतीनंतर नेमकी सत्ता कोणाची, हे स्पष्ट होईल.