शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

Satara: शिक्षकांकडे तक्रार केली, शालेय मुलाचा शाळेतील मुलांवरच जीवघेणा हल्ला; दोघे जखमी, शिरवळ येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 11:16 IST

नागरिकांच्या सतर्कतेमुळे संबंधित शालेय विद्यार्थ्याचा जीव वाचला

मुराद पटेलशिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीत शाळेत शिक्षकांकडे तक्रार केल्याच्या कारणातून शालेय विद्यार्थ्याने शाळेमधील दोन विद्यार्थ्यांवर लोखंडी घातक शस्त्राने जीवघेणा हल्ला करीत गंभीर जखमी केले आहे. दरम्यान, जीवघेणा हल्ला करणाऱ्या शालेय अल्पवयीन विद्यार्थ्याला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली. शिरवळमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे संबंधित शालेय विद्यार्थ्याचा जीव वाचला. तर हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याने घटनास्थळावरून पलायन केले.याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ परिसरात एका खाजगी शाळेमध्ये दोन भाऊ शिकतात. एक दहावीत तर दुसरा आठवीमध्ये आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी शाळेमध्ये नव्याने दाखल झालेला पंधरा वर्षीय विद्यार्थी हा नाहक त्रास देत असल्याची तक्रार संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेमधील शिक्षकांकडे केली होती. त्यानुसार शाळेमधील शिक्षकांनी पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला समज दिल्याने संबंधित पंधरा वर्षीय विद्यार्थी दोन्ही भावंडांवर चिडून होता.शुक्रवार दि. १४ जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर पंधरा वर्षीय विद्यार्थ्याने घरी निघालेल्या दोन्ही भावांना शिरवळमधील एका शाळेलगत असणाऱ्या चौकामध्ये अडवित अचानकपणे लोखंडी घातक शस्त्राने जोरदार हल्ला केला. यावेळी सतरा वर्षीय विद्यार्थी गंभीर तर भावाला वाचविताना चौदा वर्षीय भाऊ हा गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चौदा वर्षीय विद्यार्थ्याला अधिक उपचाराकरिता पुणे याठिकाणी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. यावेळी शिरवळ पोलिसांनी तपासचक्र फिरवित हल्लेखोर पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला अवघ्या वीस मिनिटांमध्ये ताब्यात घेतले. पोलिस जितेंद्र शिंदे यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. घटनेची नोंद करण्याचे काम शिरवळ पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत सुरू होते.शिरवळकरांची सतर्कता.. दोघांचा जीव वाचलाशिरवळ येथे भर चौकात विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांवर घातक शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. तिथे उपस्थित नागरिकांनी सतर्कता दाखवत हल्लेखोर विद्यार्थ्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने घटनास्थळावरून पलायन केले. नागरिकांच्या या सतर्कतेमुळे दोन्ही विद्यार्थ्यांचा जीव वाचला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थीSchoolशाळाCrime Newsगुन्हेगारी