प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:38 IST2021-03-05T04:38:25+5:302021-03-05T04:38:25+5:30

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास हाच माझा ध्यास असेल. प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असेन, अशी ...

Committed to the development of every village: Prithviraj Chavan | प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण

प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड : कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील प्रत्येक गावाचा विकास हाच माझा ध्यास असेल. प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असेन, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

गोटे (ता. कऱ्हाड) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कऱ्हाड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्या मंगलाताई गलांडे, शंकरराव खबाले, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, इंद्रजीत चव्हाण, बांधकाम विभाग उपअभियंता सुनील म्हेत्रे, अशोक पवार, गंगाराम पवार, अविनाश पवार, सुधीर पवार, रझाक पटेल, ताहीर आगा, माजी सरपंच अजीम इनामदार आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, कऱ्हाडच्या विकासासाठी मी कायमच कटिबद्ध राहिलो आहे. मुख्यमंत्री असताना मोठा निधी मला आणता आला तसेच त्यानंतर मागील पाच वर्षांतही कऱ्हाड दक्षिण मतदार संघासाठी निधी आणता आला. त्यातून विविध विकासकामे करता आली. प्रत्येक गावाचा विकास करणे हा माझा ध्यास असल्याने अधिकाधिक निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. महामार्गावरील व कऱ्हाड शहरानजीक असलेले गोटे हे गाव समृद्ध असून, या गावाने कायमच काँग्रेसच्या विचारांची पाठराखण केली आहे.

Web Title: Committed to the development of every village: Prithviraj Chavan