कापील येथे रस्त्याच्या कामास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST2021-02-21T05:12:12+5:302021-02-21T05:12:12+5:30

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने व काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कापील घुमुटमळा ते ...

Commencement of road works at Kapil | कापील येथे रस्त्याच्या कामास प्रारंभ

कापील येथे रस्त्याच्या कामास प्रारंभ

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने व काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कापील घुमुटमळा ते मलकापूर या रस्त्यासाठी १५ लाख व राकेश पाटील यांचे घर ते कापील गोळेश्वर बेघर वस्तीपर्यंतच्या रस्त्यासाठी १० लाख रुपये असा एकूण २५ लाखांचा निधी मंजूर झाला होता. या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असून, या कामाचा प्रारंभ करण्यात आला. उपसरपंच धोंडीराम मोरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन ढापरे, पराग जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी मोहनराव जाधव, वसंतराव देशमुख, भरत पाटील, जयवंत पाटील, राहुल पाटील, भाऊसाहेब ढेबे, सुभाष पाटील, सुरेश जाधव, संभाजी पाटील, भाऊसाहेब जाधव, प्रल्हाद देशमुख, जयसिंग जाधव, प्रकाश जाधव, अप्पासाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Commencement of road works at Kapil