शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रशिक्षण केंद्राला मुख्यमंत्र्यांचा ‘ग्रीन सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:39 IST

कोयनानगर : कोयनानगर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या उभारणीला मुख्यमंत्र्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला ...

कोयनानगर : कोयनानगर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या उभारणीला मुख्यमंत्र्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. या उपकेंद्रासाठी ६५ एकर जागा लागणार असून, कोयना प्रकल्प व महसूल विभागाकडे वापरात नसलेली जागा मोठ्या प्रमाणात आहे. ही जागा गृह विभागाला हस्तांतरित होणे गरजेचे आहे.

कोयनानगर येथे गृह विभाग पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या उभारणीसाठी महत्त्वाची बैठक व तो उभारणीसाठी जागा पाहणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वत: करून त्याला पसंदी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, कोयना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात, कोयना प्रकल्पाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव फाळके, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयना दौऱ्यावर आले आसताना त्यांना या बहुउद्देशीय प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांना ही संकल्पना आवडली. त्यांनी याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा प्रकल्प लवकरात लवकर उभारण्यासाठी तातडीने आराखडा तयार करा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पासाठी ६५ एकर जागा लागणार आहे. ती जागा कोयना प्रकल्पाने तातडीने द्यावी. म्हणजे हा बहुउद्देशीय प्रकल्प उभारणीसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करता येणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगीतले.

- चौकट

प्रारंभी भाडेततत्त्वावर सुरू होणार केंद्र

सद्य:स्थितीत हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कोयना प्रकल्पाने रस्ते, वीज, पाणी, इमारती या आवश्यक असणाऱ्या बाबी भाडेतत्त्वावर गृह विभागाला उपलब्ध करून द्याव्यात. या वसाहतीची देखभाल व दुरुस्ती गृह विभाग करून हे केंद्र तात्पुरते चालू करेल. इमारत उभारणी झाल्यावर स्वत:च्या जागेत हे केंद्र स्थलांतरित होईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

फोटो : २२केआरडी०३

कॅप्शन : कोयनानगर (ता. पाटण) येथे पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जागेची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, संजय डोईफोडे, श्रीरंग तांबे, सुरेश साळुंखे, आदी उपस्थित होते.