मलकापूरसह परिसरात पुन्हा ढगफुटी सदृष्य स्थिती, जोरदार पावसाने झोडपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 10:21 IST2021-06-17T10:20:06+5:302021-06-17T10:21:24+5:30
Rain : एकाच रात्रीत मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे आनेक ठिकाणी उपमार्ग जलमय झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तर अनेक शेतात पावसाचे पाणी घूसून महामार्गालगतच्या शेतांचे नुकसान झाले आहे.

मलकापूरसह परिसरात पुन्हा ढगफुटी सदृष्य स्थिती, जोरदार पावसाने झोडपले
मलकापूर : मलकापूरसह परिसरात पुन्हा ढगफुटी सदृष्य पावसाने झोडपले. रात्रभर मुसळधार पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे गोटे गावच्या हद्दीत व मलकापूरात डिमार्ट परिसरात पुणे- बंगळुरू महामार्गावर पाणी घुसल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. एकाच रात्रीत मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे आनेक ठिकाणी उपमार्ग जलमय झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तर अनेक शेतात पावसाचे पाणी घूसून महामार्गालगतच्या शेतांचे नुकसान झाले आहे.
मलकापूर परिसरात बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी दुपारनंतर तीन वाजण्याच्या सुमारास अचानक सगळीकडे ढग दाटून आल्याने दिवस मावळल्यासारखे वातावरण झाले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक कांही क्षणातच ढगफुटीसदृष्य जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे ११ तास पडलेल्या पावसामुळे मलपूरातील सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे नुकसान झाले आहे. रात्रभर झालेल्या दमदार पावसाने आगाशिव डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याचा प्रवाह कोयनावसाहतसह विठ्ठलदेव सोसायटीतसह डिमार्ठ परिसरातून उपमार्गावरून महामार्गावर शिरले. कोयनावसाहत गेट ते एन पी मोटर परिसरात उपमार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सातारा : जिल्ह्यात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचे रस्ते बंद.https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/oEicxXfBpm
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2021
आगाशिवनगरात झोपडपट्टीसह दत्त शिवम् कॉलनीतील कांही घरात रस्त्यांवरील पाण्याचा प्रवाह पुन्हा घुसला. आगाशिव डोंगरावरून अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आल्यामुळे आगाशिवनगरात देवकर वस्ती ते पवार वस्ती परिसरात दुसऱ्या दिवशीही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. यातून मार्ग काढताना वाहनधारकांसह नागरिकांना कसरत करावी लागत होती. तर ११ तास जोरदार पावसाने झोडपल्याने उपमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामूळे दोन्ही बाजूचे उपमार्ग जलमय झाले होते.
उपमार्गासह कराड-ढेबेवाडी रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मलकापूरसह परिसरात पुन्हा ढगफुटी सदृष्य पावसाने झोडपले. रात्रभर मुसळधार पावसाने धुमाकुळ घातल्यामुळे गोटे गावच्या हद्दीत व मलकापूरात डिमार्ट परिसरात पुणे- बेंगलोर महामार्गावर पाणी घुसल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.