Crime News घरात घुसून पैसे चोरणाºयास अटक-बारवकरनगर येथे घरफोडी -युवतीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 02:30 PM2019-04-19T14:30:46+5:302019-04-19T14:33:08+5:30

घरात घुसून वृद्धेच्या गळ्यातील गंठण तोडून तसेच पलायन करणाºया संशयितास पोलिसांनी पकडले. ही घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास शाहूनगर येथे घडली.प्रशांत बाबुराव मनवे (रा. मनवेवाडी, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी

Chorana arrested for stealing money from house-to-house arrest | Crime News घरात घुसून पैसे चोरणाºयास अटक-बारवकरनगर येथे घरफोडी -युवतीचा विनयभंग

Crime News घरात घुसून पैसे चोरणाºयास अटक-बारवकरनगर येथे घरफोडी -युवतीचा विनयभंग

Next

सातारा : घरात घुसून वृद्धेच्या गळ्यातील गंठण तोडून तसेच पलायन करणाºया संशयितास पोलिसांनी पकडले. ही घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास शाहूनगर येथे घडली.प्रशांत बाबुराव मनवे (रा. मनवेवाडी, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, प्रभा जनार्धन भोसले (वय ६९, रा. प्रभा श्रीधर कॉलनी शाहूनगर, सातारा) या सेवानिवृत्त असून त्यांच्या घरामध्ये गुरूवारी दुपारी मनवे याने अचानक प्रवेश केला. आरडाओरड करून भोसले यांच्या मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर भोसले यांना धक्काबुक्की करून गळ्यातील गंंठण तोडले. टिव्ही खालील ड्रॉव्हर उघडून त्यातील पाच हजार रुपये घेऊन त्याने पलायन केले.या प्रकारानंतर भोसले यांनी हा सारा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन प्रशांत मनवे याला अटक केली.

 

बारवकरनगर येथे घरफोडी 

सातारा : बारवरकर नगर येथील निरंजानी शामराव नांगरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल आणि १२ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना रात्री घडली.
नांगरे या बारवरकर नगरमधील प्रतापसिंह हौसिंग सोसायटीमध्ये राहातात. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून मोबाइल आणि १२ हजारांची रोकड असा सुमारे २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

 

दुचाकीवरून घरी सोडण्याच्या बहाण्याने युवतीचा विनयभंग

सातारा : दुचाकीवरून घरी सोडण्याचा बहाणा करून युवतीचा विनयभंग केल्याची घटना मोळाचा ओढा परिसरात दि. १३ रोजी रात्री सातच्या सुमारास घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.
जुनैद रमजान खान (वय ३३, रा. मोळाचा ओढा, परिसर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १९ वर्षीय युवती घरी चालत जात होती. यावेळी ‘चल तुला घरी सोडतो, असे म्हणून जुनैदने त्याच्या मोटारसायकलवर युवतीला बसविले. म्हसवे रोडवरील कॅनॉल येथे नेवून तिच्याशी गैरप्रकार केला. तिला आरडाओरड केल्याने जुनैदने झाडाजवळ पडलेल्या काठीने हातावर आणि पायावर मारहाण केली. तसेच दगडाने पाठीवर आणि मानेवरही मारले. या घटनेनंतर संबंधित युवतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

 

Web Title: Chorana arrested for stealing money from house-to-house arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.