शिवपराक्रमाची गाथा ऐकून लंडनचे पाहुणे हरखले, साताऱ्यातील संग्रहालयाला दिली भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:17 IST2025-10-08T17:16:47+5:302025-10-08T17:17:15+5:30

वाघनखे कोल्हापुरात !

Catherine Parsons, Director of Collection Care and Access at the Victoria and Albert Museum in London visited the Chhatrapati Shivaji Maharaj Museum in Satara | शिवपराक्रमाची गाथा ऐकून लंडनचे पाहुणे हरखले, साताऱ्यातील संग्रहालयाला दिली भेट 

शिवपराक्रमाची गाथा ऐकून लंडनचे पाहुणे हरखले, साताऱ्यातील संग्रहालयाला दिली भेट 

सातारा : लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या कलेक्शन केअर ॲंड एक्सेस विभागाच्या संचालिका कॅथरीन पारसन्स यांनी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट दिली. येथील ऐतिहासिक वस्तू व त्यांच्या संवर्धनाचे काम पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. 

संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी कॅथरीन पारसन्स यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान, पारसन्स यांनी संग्रहालयाच्या विविध दालनांना भेटी देतानाच त्यांची तपशीलवार माहिती जाणून घेतली. अभिरक्षक शिंदे यांनी त्यांना ही दालन, महत्त्वाच्या व ऐतिहासिक कलाकृती तसेच दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहाची माहिती दिली. 

संग्रहालय व्यवस्थापनाने ऐतिहासिक ठेव्याच्या जतनासाठी केलेले प्रयत्न पाहून पारसन्स प्रभावित झाल्या. या कामाची त्यांनी प्रशंसा केली. संग्रहालयाच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली असून, यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कलेच्या आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी सुरू असलेल्या कार्याची देवाणघेवाण होणार आहे. यावेळी संग्रहालयातील कर्मचारी उपस्थित होते.

वाघनखे कोल्हापुरात !

शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणारी लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमधील वाघनखे दि. १९ जुलै २०२४ रोजी साताऱ्यात दाखल झाली. सात महिन्यांनंतर ही वाघनखे नागपूरला व त्यानंतर दि. ३० सप्टेंबर रोजी ती कोल्हापूर येथील लक्ष्मीनिवास संग्रहालयात विसावली. ही वाघनखे सुखरूप, कोल्हापूरपर्यंत पोहचविण्यासाठी कॅथरीन पारसन्स आल्या होत्या. या नियोजित दौऱ्यावेळी त्यांनी संग्रहालयाला भेट दिली

Web Title : शिवाजी की वीरता से मोहित लंदन के मेहमान, सतारा संग्रहालय का दौरा

Web Summary : विक्टोरिया एंड अल्बर्ट संग्रहालय की निदेशक ने सतारा के शिवाजी महाराज संग्रहालय का दौरा किया, ऐतिहासिक कलाकृतियों के संरक्षण से प्रभावित हुईं। उन्होंने शिवाजी के बाघ नखों को महाराष्ट्र में दौरे के बाद कोल्हापुर में सुरक्षित वापसी की निगरानी की।

Web Title : London Visitors Enchanted by Shivaji's Valor, Visit Satara Museum

Web Summary : Victoria & Albert Museum director visited Satara's Shivaji Maharaj Museum, impressed by historical artifact preservation. She oversaw the safe return of Shivaji's tiger claws to Kolhapur after a tour across Maharashtra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.