Satara: चालकाचे नियंत्रण सुटल्याने आंबेनळी घाटात कार १०० फूट दरीत कोसळली, पाचजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:06 IST2025-12-26T16:05:34+5:302025-12-26T16:06:42+5:30
महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार

Satara: चालकाचे नियंत्रण सुटल्याने आंबेनळी घाटात कार १०० फूट दरीत कोसळली, पाचजण जखमी
महाबळेश्वर : पर्यटनस्थळी अमरावती येथून देवदर्शन करत कोल्हापूर करून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात दोनजण गंभीर, तर तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलाचा समावेश आहे. हा अपघात गुुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला.
चालक निखिल शशिकांत पांढरीकर (वय ४३) शशिकांत माधवराव पांढरीकर (७५, रा. ६७, हरी भाऊ कॉलनी नगर, अमरावती) असे गंभीर, तर पल्लवी अभिजीत काशीकर (वय ४४), यक्षीत अभिजीत काशीकर (९) व शरयू शशिकांत पाढंरीकर (६५) अशी किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमरावती येथून देवदर्शन करत कोल्हापूर करून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळले. अमरावती येथून देवदर्शन करत कोल्हापूर करून किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट १०० फूट खोल दरीत कोसळले.
या अपघाताची माहिती समजताच महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्यासह पोलिस कर्मचारी व स्थानिक प्रतापगड रेस्क्यू टीमसह महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुमारे १०० फूट खोल दरीमधून हे बचावकार्य करण्यात आले. जखमींंना अधिक उपचारांसाठी साताऱ्याला दाखल करण्यात आले आहे.
या बचावकार्यत ट्रेकर्सचे सुनील भाटिया, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामणे, अमित कोळी, अनिकेत वागदरे, सुजित कोळी, संकेत सावंत, ओंकार शेलार, आदित्य बावळेकर, साई हवलदार, दीपक ओंबळे आदींनी सहभाग घेतला.