Satara News: विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या कारला आग, सुदैवाने जिवीतहानी टळली; कार जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 12:53 IST2023-02-25T12:52:41+5:302023-02-25T12:53:07+5:30
मुराद पटेल शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथे विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या शाळेच्या कारला अचानकपणे आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ...

Satara News: विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या कारला आग, सुदैवाने जिवीतहानी टळली; कार जळून खाक
मुराद पटेल
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शेडगेवाडी फाटा येथे विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या शाळेच्या कारला अचानकपणे आग लागली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र कारआगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेडगेवाडी येथून वाठार कॉलनी येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेवून येत असताना कारमधून अचानक धूर निघाला. ही बाब चालकाच्या निदर्शनास आली. चालकाने प्रसंगावधान दाखवीत तात्काळ कारमधील ८ ते १० विद्यार्थ्यांना बाहेर काढत सुरक्षितस्थळी नेले.
दरम्यान, आगीने पेट घेतल्याने आगीचे लोळ पसरले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली. आगीत कार संपूर्ण जळून खाक झाली. दरम्यान, कारला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, घटनास्थळी लोणंद पोलिसांनी धाव घेतली. या अपघाताने कारच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षीतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.