Bullock cart race; Four crimes committed in Indoli | धोंडेवाडीत बैलगाडी शर्यत; इंदोलीतील चौघांवर गुन्हा
धोंडेवाडीत बैलगाडी शर्यत; इंदोलीतील चौघांवर गुन्हा

ठळक मुद्देधोंडेवाडीत बैलगाडी शर्यतइंदोलीतील चौघांवर गुन्हा

मायणी : मायणीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धोंडेवाडी रायघुडे मळा येथे बैलगाडी शर्यती बेकायदेशीररीत्या भरविल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईत दोन बैल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, मायणीपासून चार किलोमीटर अंतरावर धोंडेवाडी गाव आहे. येथील रायघुडे मळा या ठिकाणी बेकायदा बैलगाड्या शर्यती आयोजित करण्यात आल्याची माहिती मायणी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.

पोलीस आल्याचे समजताच बैलगाड्या व त्यांच्या मालकांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून सोमनाथ निकम, विशाल सावंत, तुकाराम निकम व नाना निकम (सर्व रा. इंदोली, ता. कऱ्हाड ) या चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद नवनाथ शिरकुळे यांनी दिली असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी करत आहेत.

Web Title: Bullock cart race; Four crimes committed in Indoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.