शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर कंग्राळकरांचा फुगा फुटला !--कहाणी एका बिल्डराची...

By admin | Updated: July 25, 2014 22:15 IST

बेकायदेशीर प्रकल्पांची तक्रार : राष्ट्रवादी पक्षाची भलतीच गोची

सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी खूप जवळीक असल्याचे भासवून स्थानिक प्रशासन यंत्रणेला आजपावेतो नमवू पाहणाऱ्या साताऱ्यातील एका बिल्डरच्या नसत्या उचापत्यांमुळे आता राष्ट्रवादी पक्ष मात्र कोंडीत सापडला आहे. भर व्यासपीठावर अंगभर झुकून राष्ट्रवादी मंत्र्यांसमोर कुर्निसात करणाऱ्या या उचापतखोर बिल्डरची ‘हवा’ अखेर सातारच्या तहसीलदारांनीच काढून घेतलीय. अवैध उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी येथील बांधकाम व्यावसायिक श्रीधर आनंदराव कंग्राळकर यांना २२ लाख ९५ हजार ७०० रुपये दंडाची नोटीस धाडली आहे. कंग्राळकर यांनी राधिका रस्त्यावरील सि.स.नं.२८३/१अ प्लॉट नं. १ मध्ये उत्खनन केले आहे. या नोटिसीनंतर कंग्राळकर यांनी अद्याप दंड भरलेला नाही. मात्र, या नोटिसीवर प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले आहे, तर ‘न्यायाच्या भूमिकेत’ मुदत द्यावी, अशी याचना कंग्राळकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा दौऱ्यावर असताना ‘रिपाइं’ युथचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर गालफाडे व कार्यकर्त्यांनी त्यांची विश्रामगृहावर जाऊन भेट घेतली होती. कंग्राळकर व यांच्या प्रकल्पातील अनेक कारनाम्यांची कहाणी अजितदादांच्या कानावर पडल्यानंतर ते सुद्धा अवाक् झाले. गंभीर होत त्यांनी कंग्राळकर प्रकरणात प्रशासनाला कारवाईच्या सूचना केल्या जातील, असे आश्वासन दिल्याचे गालफाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यामुळे उठसूठ पवारांचे नाव घेऊन सातारच्या प्रशासनावर दबाव टाकू पाहणाऱ्या या बिल्डरच्या नावाचा फुगा फुटला आहे.जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या गटाने ठरावाद्वारे शेतीतून रस्ता काढण्यास परवानगी दिली होती. या ठरावाला जिल्हा परिषदेचे सदस्य व जावळी विकास आघाडीचे अध्यक्ष दीपक पवार यांनी विरोध केला होता. अशा अनेक प्रकरणांची व्याप्ती हळूहळू वाढतच चालली आहे. संबंधिताने राजकीय नेत्यांच्या नावाचा वापर करून आजपर्यंत अनेक प्रश्न उलटे-सुलटे करून सोडविले होते; परंतु आता बहुतांश पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या बिल्डरच्या बेकायदेशीर गोष्टींविरुद्ध शड्डू ठोकल्यामुळे खुद्द राष्ट्रवादी पक्षाची गोची झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कंग्राळकरांच्या वेगवेगळ्या प्रकरणांना तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची पाठराखण केल्यास या निवडणुकीत विरोधकांना ते आयते कोलीत मिळणार आहे. अशा परिस्थितीत ही ‘रिस्क’ राष्ट्रवादीचे नेते घेतील, याची शक्यताच नाही. त्यामुळे दंडाची रक्कम भरून कारवाई टाळण्याशिवाय कंग्राळकर यांच्यापुढे दुसरा पर्यायच नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)ही हुजरेगिरी की रुबाब ?कंग्राळकर हे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी जवळीक असल्याचे दाखविण्यासाठी जाणीवपूर्वक तशी कृती करतात, असा आरोप संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. सातारा येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कंग्राळकर यांनी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या पायापर्यंत वाकत त्यांना कुर्निसात केला होता. भर व्यासपीठावर एका बिल्डरने केलेले हे प्रदर्शन पाहून कार्यकर्तेही चक्रावले होते. दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या शिफारशीनेच त्यांना जिल्हा परिषदेच्या शेतीमधून नव्या बांधकाम प्रकल्पासाठी रस्ता मिळाल्याचे सांगितले जाते. यावरूनही काही दिवसांपासून वाद सुरू आहे. केवळ एका बिल्डरमुळे राष्ट्रवादी पक्षाची मधल्यामध्ये गोची झाली आहे.