शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

ढगाच्या अभ्यासासाठी महाबळेश्वरच्या आकाशात रोज एक फुगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 5:54 PM

जगदीश कोष्टी चांगला पाऊस पडण्यासाठी बाष्पयुक्त काळे ढग असणे आवश्यक असते. पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी ढगामधील बाष्प, आर्द्रता, धुलिकणांचा ...

जगदीश कोष्टीचांगला पाऊस पडण्यासाठी बाष्पयुक्त काळे ढग असणे आवश्यक असते. पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी ढगामधील बाष्प, आर्द्रता, धुलिकणांचा अभ्यास होणे गरजेचे असते. यासाठी महाबळेश्वरमध्ये ढग संशोधन केंद्र कार्यरत आहे.महाबळेश्वर अंतिउंचीवर असल्याने ढग खूपच खाली आलेले असतात. तेथील ढगांचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणाहून दररोज एक फुगा आकाशात सोडला जातो. यामुळे शास्त्रज्ञांना चांगली मदत होत असते. विज्ञान आणि आधुनिक युगाची देणगी आहे. महाबळेश्वरातअसणारे अणु संशोधन केंद्र विज्ञानाचे क्रांती म्हणावे लागेल.

पूर्वी विमानांच्या मदतीने ढगांमध्ये शिरून ढगांचे निरीक्षण केले जात असे मात्र या अभ्यासादरम्यान नानाविध अडचणींचा सामना करावा लागत होता. शासनाची परवानगी मिळविण्यापासून ते ढगांमध्ये पोहोचेपर्यंत ढगांच्या मुळ परिस्थितीत बदल होत असे. त्यामुळे संशोधनात अडचणी निर्माण होत असत.या सर्व समस्या लक्षात घेता भारत सरकारच्या मान्सूनी मिशन या कार्यक्रमांतर्गत महाबळेश्वरात संशोधन केंद्र साकारण्यात आलेले ढग जमिनीवर असतात. त्यामुळे येथे ढगांची निरीक्षण करणे त्यांचा अभ्यास करणे अधिक सोपे झाले. तापमान आर्द्रता बाष्पीभवन रेडिएशन आदींचा अभ्यास येथील प्रयोगशाळेत केला जात आहे. सुमारे ३५ किलोमीटर परिसरातील घटकांचे विश्‍लेषण या संशोधन केंद्रात केले जाते.विमानाच्या माध्यमातून चालणाऱ्या ढगांच्या संशोधनासाठी वापरली जाणारी सर्व यंत्रणा येथील प्रयोगशाळेमध्ये बसविण्यात आली आहे. यावर आधारित ढगांनी यांच्या संशोधनाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. प्रयोगशाळेच्या अंतरंगातून आणि वातावरणातील वेगवेगळ्या प्रकारचे धूलिकण यांचा परस्परसंबंध त्यांचे होणारे परिणाम अभ्यासणे याचे एक प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. जैविक घटकांवर होणारा परिणाम आहे. या प्रयोगशाळेतून अभ्यासला जातो. ढगांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी यंत्रणा प्रयोगशाळेत आहे. पावसात काम करू शकतील अशी यंत्रे या प्रयोगशाळेच्या छतावर बसविण्यात आले आहेत. या यंत्रांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. या नोंदीच्या आधारे वेगवेगळ्या पद्धतीचे आलेख तयार करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे शक्य झाले आहे.

मांढरगडावरही ढग संशोधन केंद्रमांढरगडावर सुमारे तीन गुंठे जागेत २०१२ मध्ये ढग संशोधन केंद्र सुरू केले होते. या ठिकाणीही पावसाळ्यापूर्वीच्या पांढऱ्या ढगांचा अभ्यास, काळे ढग, त्यांचा वेग, त्यांची उंची, त्यामध्ये असलेल्या बाष्प, आर्द्रतेचा अभ्यास केला जात होता. २०१९ ला येथील काम बंद करण्यात आले. त्यानंतर २०२० मध्ये तेथील यंत्रणा काढून नेण्यात आली.पंधरा किलोमीटर अंतरातील अभ्यासमांढरगडावर उभारलेल्या ढग संशोधन केंद्राची क्षमता पन्नास किलोमीटर होती. मात्र येथे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरात येणाऱ्या ढगांबाबत अभ्यास केला जात होता. या ठिकाणी असलेली यंत्रणा विविध निरीक्षणे करून नोंदी नोंदवत होती.अमेरिकेकडून देखभालया ठिकाणी कार्यरत असलेली यंत्रणा कधी बंद पडली, तर अमेरिकेतील तंत्रज्ञ मंडळी भेट देऊन देखभाल करत असत. तेथील अधिकारी येथे येऊन दुरुस्ती करत होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानweatherहवामान