शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

महाप्रसादाच्या खर्चातून बांधला पूल

By admin | Updated: October 30, 2015 23:45 IST

वडोली निळेश्वर : चाळीस हजार खर्च; नवरात्रोत्सव मंडळ, ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी -- गुड न्यूज

शंकर पोळ -- कोपर्डे हवेली वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथील नवरात्र उत्सव मंडळातील युवकांनी आपल्या मंडळाच्या खर्चातून गावातील ओढ्यावर चाळीस हजार रुपये खर्च करून पूल बांधला आहे. युवकांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व ग्रामस्थांनी कौतुकही केले.नवरात्र उत्सवाच्या काळात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत अनेक उपक्रम सर्वत्र राबविले गेले. मात्र, गावासाठी चांगल्या प्रकारची सुविधा उभारावी या हेतूने उपक्रम राबविणाऱ्यांची संख्या फारच कमी पहावयास मिळते. गावाच्या विकासासाठी वडोली निळेश्वर येथील नवरात्र उत्सव मंडळातील युवकांक डून गेल्या २३ वर्षापासून दुर्गादेवीचा उत्सव साजला केला जातो. यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत असल्याचे लक्षात घेऊन गावातील युवकांनी ओढ्यातून वाया जाणारे पाणी अडवून ठेवण्यासाठी ओढ्यावर बंधारा बांधला. गावातील सटवाईदेवी मंदिरालगत पूल उभारण्याचा निर्णय युवकांनी घेतला व पूल बांधला.दरवर्षी या मंडळाकडून ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाप्रसादासाठी वीस ते चाळीस हजार रुपये इतका खर्च येतो. यावर्षी महाप्रसाद रद्द करून गावासाठी कायमस्वरूपी पूल असावा, असा निर्णय युवकांनी घेतला व त्याला ग्रामस्थांनी मंजुरी दिली. त्यानंतर महाप्रसादाच्या खर्चातून गावातील ओढ्यावर पूल बांधण्यात आला. सहकार्यातून उभारणीग्रामस्थांना विश्वासात घेऊन उभारला पूल वडोली निळेश्वरमधील बालवीर मंडळासह इतर मंडळे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवितात. या उपक्रमांना ग्रामस्थांचे चांगले सहकार्य असते. उत्सवाच्या कालावधीत ही मंडळे देणगी स्वरूपात रक्कम जमा करतात. त्यातून उत्सव पार पाडण्याबरोबरच काही विधायक कामे केली जातात. यावर्षी बालवीर मंडळाने पूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्यासह उपाध्यक्ष विकास पवार, खजिनदार गणेश पवार, सदस्य सुनील पवार, अभिजीत पवार, तानाजी पवार, संभाजी शिंदे, अविनाश पवार, संभाजी पवार यांनी इतर सभासद व सदस्यांशी चर्चा केली. संबंधित देणगी ग्रामस्थांकडून गोळा करण्यात आली असल्याने ती खर्च करताना ग्रामस्थांना विश्वासात घेणे गरजेचे होते. ज्यावेळी हा विषय ग्रामस्थांसमोर मांडण्यात आला. त्यावेळी त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि पुलाची उभारणी झाली. गत २३ वर्षापासून आम्ही महाप्रसादाचे आयोजन करीत होतो. मात्र यावर्षी इतर मंडळांसमोर आदर्श ठेवण्यासाठी आणि गावाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी देणगी स्वरूपातील रक्कम या पुलासाठी वापरली आहे.- शिवाजी शिंदेअध्यक्ष, बालवीर मंडळ