शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

विडणीत तरसाच्या हल्ल्यात दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:27 IST

कोळकी : विडणी परिसरात तरसाचे दर्शन झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील पवार वस्ती, जगताप ...

कोळकी : विडणी परिसरात तरसाचे दर्शन झाल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील पवार वस्ती, जगताप वस्ती (आंब्याचा माळ) या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून तरसाचा वावर वाढला आहे. येथील लोकांनी आपल्या शेतात कामाला जात असताना तरसाला पाहिले आहे तर येथीलच दोन जणांवर या तरसानीही हल्ला केला आहे. यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरिक व शेतकरी वर्ग तरसाच्या भीतीने घाबरून गेले आहेत.

विडणी गाव हे बागायती क्षेत्र असल्याने फलटण तालुक्यात सर्वात जास्त उसाचे क्षेत्र आहे. रात्रीच्या वेळी हिंस्त्र प्राणी बाहेर पडतात, कधी माणसांवरही हल्ला करू शकतात. विडणीतील पवारवस्ती व जगतापवस्ती परिसरातील उसाच्या पिकांमध्ये अनेक तरस दिसत आहेत. परिसरातील वातावरण भयभीत झाले असून, लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत फलटण वनविभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या हिंस्त्र प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी पवारवस्ती येथे ठसे आढळून आले असून, हे ठसे तरसाची असल्याचे फलटण वनविभागाचे अधिकारी मारुती निकम यांनी सांगितले.

पॉईंटर करणे...

- जून महिन्यात शेतकऱ्यांची शेतातील कामाची लगबग सुरू असते; पण तरस या हिंस्त्र प्राण्याच्या दर्शनामुळे शेतात काम करायला मजूर यायला तयार नाहीत, यामुळे शेतकऱ्यांची शेतातील कामे खोळंबली आहेत.

-फलटण येथील वनविभागाचे अधिकारी राहुल निकम यांच्याशी संपर्क साधला असता घटनास्थळी भेट दिली असून, ठसे हे तरसाचे असल्याचे सांगून हा प्राणी रोजच ५० ते ६० किलोमीटर परिसरात भटकत असतो, तसेच मृत जनावरे खात असतो. माणसांवर हा प्राणी हल्ला करत नाही, दुर्मीळ एखादी घटना असेल माणसांवर हल्ला केलेली. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

फोटो : पवारवस्ती येथील लोकवस्तीमध्ये तरसाचे ठसे आढळून आले आहेत.(छाया : सतीश कर्वे)