शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता विवाहितेचा मृतदेह नदीत आढळला

By admin | Updated: November 1, 2015 23:50 IST

रेठरे बुद्रुकमधील घटना : नातेवाइकांचा रुद्रावतार; रुग्णालयात तणाव

कऱ्हाड : रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह रविवारी दुपारी कृष्णा नदीपात्रात आढळून आला. दरम्यान, कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर माहेरच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत सासरच्या मंडळींवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जास्मिन नौशाद मुल्ला (वय २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिरवडे येथील जास्मिनचा विवाह सात वर्षांपूर्वी रेठरे बुद्रुकमधील नौशाद मुल्लाशी झाला होता. विवाहानंतर सासरच्यांनी जास्मिनला शारीरिक व मानसिक त्रास दिला. अशातच दोन दिवसांपूर्वी सकाळी जास्मिन घरातून बेपत्ता झाली. सासरच्यांसह माहेरच्या नातेवाइकांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. रविवारी जास्मिनचा मृतदेह कृष्णा नदीपात्रात आढळून आला. ताहेर चाँद संदे यांनी तालुका पोलिसांत खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविला. मात्र, सासरच्यांवर कारवाईची मागणी करीत माहेरच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे तणावाचे वातावरण होते. अखेर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. (प्रतिनिधी)