शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप म्हणते ‘हम भी है तय्यार’

By admin | Updated: September 17, 2014 22:25 IST

स्वबळाची चाचपणी : प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी

मोहन मस्कर-पाटील - सातारा-- एका बाजूला शिवसेना सातारा जिल्ह्यात स्वतंत्र चाचपणी करत असताना भारतीय जनता पार्टीही आता मागे राहिलेली नाही. शिवसेनेचा सुटलेला बाण जर परत येत नसेलतर भाजपने जिल्ह्यातील इच्छुकांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यात आठ मतदारसंघ असून गेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यानुसार कऱ्हाड उत्तर, वाई, कोरेगाव, फलटण, पाटण हे पाच शिवसेनेकडे तर सातारा, कऱ्हाड दक्षिण, माण हे तीन मतदारसंघ भाजपकडे होते. लोकसभेतील यशानंतर भाजपने पहिले तीन आणि आता अधिकचे दोन असे पाच मतदारसंघ मागितले आहेत. भाजपची ही मागणी सेनेला खटकणारी आहे.साताऱ्यातून भाजपने गेली काही वर्षे अंतर्गत तयारी सुरू केली आहे. येथून दत्ताजी थोरात आणि सुवर्णा पाटील यांच्या नावाची चर्चा आहेत. हा मतदारसंघ भाजपकडे गेलाच तर त्यांच्यापैकी कोणीतरी एक उमेदवार असणार आहे. रवींद्र परामणे यांनीही विधानसभेसाठी इच्छुकता दर्शविली आहे. माजी आ. सदाशिव सपकाळ यांना भाजप निष्ठावंतांचा विरोध आहे.‘कऱ्हाड दक्षिण’मधून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील इच्छुक आहेत. मात्र, जर काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिलीतरी आ. उंडाळकरांच्या विरोधात भाजप उमेदवार देणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोरेगावातून भाजपकडे दोन चेहरे आहेत. कांताताई नलावडे यांच्या नावाचा आग्रह येथून झाला आहे नुकतेच भाजपवासी झालेल्या महेश शिंदे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी संपर्क वाढविला आहे. दिलीप येळगावकर यांनीही माणमधून शड्डू ठोकला आहे. बाळासाहेब खाडे, बाळासाहेब मासाळ आणि डॉ. महादेव कापसे यांनीही येथून उमेदवारी मागितली आहे. पाटणमधून दीपक महाडिक, कविता कचरे तर कऱ्हाड उत्तरमधून धैर्यशील पाटील-शिरगावकर यांची नावे आहेत.फलटणमधून कोण..?फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. येथून भाजपचे उमेदवार कोण असा जर प्रश्न उपस्थित केला तर कोणाचेही नाव पुढे येत नाही. भाजपचे अस्तित्व येथे अगदीच नगण्य आहे. अनेकांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावेही माहित नाहीत. त्यामुळे येथून भाजपचा उमेदवार कोण असेल, याची चर्चाच करता येत नाही. जर उमेदवार द्यायचाच झाला तर तो कोण असेल, याचा शोध अजून भाजपने सुरू केलेला नाही. मात्र, पक्ष वगळता येथून प्रा. अनिल जगताप, रमेश आढाव, अ‍ॅड. प्रशांत कोरेगावकर इच्छूक आहेत.वाईत संभ्रमावस्था कायम...वाई मतदारसंघात भाजपची संभ्रमावस्था कायम आहे. गेल्यावेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. येथून पुरुषोत्तम जाधवांनी नशीब आजमावले, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांनी सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत लोकसभा लढली. तेथेही अपयश आले. आता तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत वाईतून उमेदवारी मागितल्याचे सांगण्यात येते. मात्र, वाईतून माजी आमदार मदन भोसले भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झालीच नाहीतर मदन भोसले काँग्रेसकडून लढणार हे निश्चित आहे. त्यामुळे येथील उमेदवारीच्या अनुषंगाने भाजपपुढेही संभ्रमावस्थाच आहे.