शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
2
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
5
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
6
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
7
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
8
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
9
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
10
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
11
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
12
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
13
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
14
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
15
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
16
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
17
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
18
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
19
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
20
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-राष्ट्रवादीत स्पर्धा; सातारा जिल्ह्यात पंचायत समितीत कोण बनेल ‘मोठा भाऊ’

By नितीन काळेल | Updated: March 16, 2026 19:14 IST

‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती; शिंदेसेना पाटणला फिक्स, चार ठिकाणी राजकीय जुळवाजुळव

नितीन काळेल

सातारा : जिल्ह्यातील ११ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक १६ मार्च रोजी होत असून सर्वत्रच महायुतीचीच सत्ता येणार, हे मात्र नक्की आहे. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी स्वबळावर प्रत्येकी तीन पंचायत समितीत सत्ता आणू शकते. तर शिंदेसेनेला पाटणमध्ये झेंडा फडकवता येणार आहे. पण, चार ठिकाणी चिठ्ठी किंवा राजकीय जुळवाजुळवीचा निर्णय होणार असल्यामुळे राजकीय खेळीकडे लक्ष लागून राहणार आहे.

जिल्ह्यातील पंचायत समितीची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी पार पडली. आता सोमवार, दि. १६ मार्च रोजी त्या-त्या तालुक्यात सभापती आणि उपसभापतिपदाची निवडणूक होत आहे. जिल्ह्यात महायुती अंतर्गतच सर्वच पंचायत समितीत सत्ता स्थापन होणार आहे. यामध्ये भाजपच मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे. खटाव, सातारा आणि कराडमध्ये भाजपचाच सभापती होईल.

याठिकाणी भाजपला कोणाच्या कुबड्याची गरज लागणार नाही. त्यामुळे स्वबळावर भाजप सत्ता स्थापन करू शकते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही खंडाळा, कोरेगाव आणि वाई पंचायत समितीत सत्ता मिळू शकते. तर शिंदेसेनेला पाटणमध्ये एकहाती आणि मोठ्या बहुसंख्येने सभापतिपद मिळणार आहे. या ७ पंचायत समितींच्या सत्ताकारणात अधिक करून फाटाफूट होण्याची शक्यता कमीच आहे.

‘ऑपरेशन लोटस’ची धास्ती...

जिल्ह्यातील ७ पंचायत समितीतील सत्ता समीकरणे स्पष्ट असलीतरी माण, फलटण, महाबळेश्वर आणि जावळीतील चित्र निश्चित नाही. माणमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीलाही समसमान म्हणजे १० पैकी प्रत्येकी ५ जागा मिळाल्या आहेत. फलटणला १६ पैकी भाजपला ५ आणि त्यांच्याबरोबर युती केलेल्या राष्ट्रवादीला ३ जागा जिंकता आल्यात. तर शिंदेसेनेने स्वबळावर ८ जागा पदरात पाडून घेतल्या. याठिकाणी भाजपबरोबर राष्ट्रवादी जाऊ शकते. त्यामुळे येथील कल हा निवडीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

या दोन्ही पंचायत समितीत चिठ्ठीचा प्रयाेग होणार की, ‘ऑपरेशन लोटस’चा विजय अन्यथा काय घडामोडी होणार हे त्याचदिवशी समजणार आहे. जावळी पंचायत समितीत भाजपला ३ तर शिंदेसेना २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले. येथे शिंदेसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते. मग, ईश्वरचिठ्ठी की आणखी वेगळी राजकीय खेळी यावर येथील सभापतीची निवड अवलंबून आहे. महाबळेश्वरला शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ सदस्य आहेत. त्यामुळे सत्ता वाटून घेणार की, चिठ्ठीद्वारे सत्ता स्थापन करणार यावरून सध्या चर्चा सुरू झालेली आहे.

माण, जावळी, फलटणमध्ये दिग्गजांच्या नेतृत्वाचा कस...

माण तालुक्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. तालुक्यातील पंचायत समितीच्या १० पैकी ५-५ गणांत भाजप आणि राष्ट्रवादीचे सदस्य झाले आहेत. येथे चिठ्ठीद्वारे सभापती निवड होण्याचीच अधिक शक्यता आहे. जावळीतही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेले आहे. फलटणला ‘राजे’ गटाने ताकदीने खिंड लढविली. पण, शिंदेसेनेला बहुमतासाठी एक जागा कमी पडली. आता येथेही ‘राजे’ गटाचा कस लागला आहे. आता राजकीय खेळींकडेच लक्ष लागून राहिलेले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-NCP race: Who will be 'big brother' in Satara?

Web Summary : BJP and NCP compete for power in Satara Panchayat Samitis. Alliances will determine who dominates, with some seats decided by lottery or political maneuvering.