सदर बझारमधील या घटनेने खळबळ; मास्क का लावला नाही विचारणाऱ्या होमगार्डला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:42 PM2020-04-23T12:42:30+5:302020-04-23T12:43:18+5:30

म्हमाणे यांनी त्याला तोंडाला मास्क का लावला नाही, अशी विचारणा केली. आपल्याला पोलीस पकडतील, अशी धास्ती वाटल्याने संबंधित युवक पळू लागला. पळत असताना तो खाली पडला.

 Beating a homeguard who asks why he didn't wear a mask | सदर बझारमधील या घटनेने खळबळ; मास्क का लावला नाही विचारणाऱ्या होमगार्डला मारहाण

सदर बझारमधील या घटनेने खळबळ; मास्क का लावला नाही विचारणाऱ्या होमगार्डला मारहाण

Next
ठळक मुद्देचारजण ताब्यात ; पोलिसांनी धरपकड करून चारजणांना ताब्यात घेतले

सातारा : ह्यतोंडाला मास्क का लावला नाही,ह्ण अशी विचारणा केल्यामुळे होमगार्डला मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सदर बझारमध्ये घडली. या घटनेनंतर पोलिसांनी सदर बझारमध्ये धरपकड करून चारजणांना ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी, सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने पोलिसांच्या मदतीला होमगार्डही बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आले आहेत. सदर बझारमध्ये होमगार्ड व्ही.पी.म्हमाणे यांची गुरुवारी सकाळी दहा वाजता नेमणूक होती. त्यावेळी एक युवक तोंडाला मास्क न लावता तेथे आला. म्हमाणे यांनी त्याला तोंडाला मास्क का लावला नाही, अशी विचारणा केली. आपल्याला पोलीस पकडतील, अशी धास्ती वाटल्याने संबंधित युवक पळू लागला. पळत असताना तो खाली पडला.

घरी गेल्यानंतर त्याने होगार्डकडून मारहाण झाल्याचे सांगितले. त्यामुळे मोठ्या संख्येने जमाव होमगार्डच्या अंगावर धावून आला. म्हमाणे यांना धक्काबुक्की करत काहींनी मारहाण केली. त्यामुळे सदर बझारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारानंतर काही पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच शहर पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी सदर बझारमध्ये धरपकड करून चारजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलीस कसून चौकशी करत होते. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title:  Beating a homeguard who asks why he didn't wear a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.