शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

आयोगाच्या रडारवर बँका

By admin | Updated: September 17, 2014 22:28 IST

जिल्हाधिकारी : संशयास्पद खात्याची माहिती दररोज देण्याचे आदेश

सातारा : ‘उमेदवारांना बँकांमध्ये खाते उघडण्यासाठी प्राधान्य द्यावे, त्याचबरोबर संशयास्पद व्यवहाराची माहिती बँकानी खर्च संनियंत्रण कक्षाकडे देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध बँकांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनंदा गायकवाड, खर्च संनियंत्रण कक्षाच्या नोडल अधिकारी भारती देशमुख, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक संजय वाघ आदीं उपस्थित होते.जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा २८ लाख करण्यात आली आहे. त्याबरोबर हा सर्व खर्चाचा व्यवहार करण्यासाठी उमेदवाराला बँकेत खाते उघडणे बंधनकारक केले आहे. या खात्यामार्फत करण्यात आलेल्या व्यवहाराचा तपशील खर्च संनियंत्रण कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवाराने ही माहिती विहित स्वरूपात सादर न केल्यास उमेदवारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकणार आहे. त्यासाठी आपल्या बँकांच्या शाखेत उमेदवार खाते उघडण्यासाठी आल्यास त्यास प्राधान्य द्यावे.’दोन महिन्यांत खात्यावर कोणताही व्यवहार झालेला नसताना अचानकपणे त्या खात्यावर काही ठिकाणाहून पैसे जमा झाले, अथवा एका खात्यातून वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले, अथवा दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली, अथवा जमा केली अशा संशयास्पद खात्याची माहिती दररोज ल्लङ्मीि’ङ्माा्रूी१ी७स्र2014@ॅें्र’.ूङ्मे या मेलवर पाठविण्यात यावी.या बैठकीस बँक आॅफ इंडियाचे मुख्य प्रबंधक ई. अ. सय्यद, युनियन बँक आॅफ इंडियाचे आर. एस. सय्यद, स्टेट बँक आॅफ हैद्राबादचे व्यवस्थापक एम. एस. नायकवडी, स्टेट बँक आॅफ इंडियाचे उपव्यवस्थापक एस. एच. मेटकरी, विजया बँकेचे व्यवस्थापक एच. आर. प्रशु त्याचबरोबर देना, आयसीआयसीआय, सिंंडीकेट, युको, पंजाब नँशनल, एचडीएफसी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्ह्यासाठी चार निरीक्षकजिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, ‘याबाबतची सविस्तर माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. दोन मतदार संघांसाठी एक असे आपल्या जिल्ह्यासाठी चार खर्च निरीक्षक येणार आहेत. एखादी एजन्सी बँकेसाठी आऊटसोर्सिंग करत असेल, तर त्या एजन्सीकडे ओळखपत्र तसेच संबंधित बँकेचे ओळखपत्र आहे की नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. संशयास्पद व्यवहार, बनावट नोटा आदींबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे.