शंकर मंदिरात बाईच्या बुवाबाजीचा पर्दाफाश

By Admin | Updated: July 15, 2014 01:26 IST2014-07-15T01:12:29+5:302014-07-15T01:26:30+5:30

जादूटोणाविरोधी कायदा : जिल्ह्यात पहिली कारवाई

Baker's boating exposed in Shankar temple | शंकर मंदिरात बाईच्या बुवाबाजीचा पर्दाफाश

शंकर मंदिरात बाईच्या बुवाबाजीचा पर्दाफाश

कऱ्हाड/मलकापूर : ओंड, ता़ कऱ्हाड येथील शंकराच्या मंदिरात होत असलेल्या बुवाबाजीचा ‘अंनिस’कडून सोमवारी पर्दाफाश करण्यात आला़ जादूटोणाविरोधी नवीन कायद्यानुसार ही जिल्ह्यातील पहिली कारवाई आहे़
रंजना संजय पवार (वय ३८, मूळ रा़ ओंड सध्या राहणार संत तुकाराम हायस्कूल जवळ, शुक्रवार पेठ कऱ्हाड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे़
याबाबत पोलीस व अंनिस कडून मिळालेल्या माहितीनुसार, रंजना पवार ही महिला ‘इयत्ता तिसरीत असताना एक रुपयाच्या कागदावर शंकराचा दृष्टांत झाला,’ असे सांगून, ‘शंकर माझ्याशी थेट संपर्क करतो,’ असा प्रचार करत होती. सहा वर्षांपासून पाटील मळा आेंड, ता़ कऱ्हाड येथील शंकराच्या मंदिरात दर सोमवारी तिचा दरबार भरत असे़ जादूटोण्याच्या नावाखाली आर्थिक, मानसिक फसवणूक करत होती़
या भागातील एका कुटुंबाला विश्वासात घेऊन मुलीचा नवरा डॉक्टर आहे़ त्याच्या दवाखान्यात तृतीयपंथीने डॉक्टरला शाप दिला आहे, त्यामुळे तुमच्या मुलीला मूल होत नाही, अशी बतावणी सांगून सुशिक्षित कुटुंबात विष कालवण्याचे प्रयत्न केला़ धाडसाने त्यामुलीने अंनिसशी संपर्क करून पंधरा दिवसांपासून या बुवाबाजीचे ‘स्टिंग आॅपरेशन’ करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार आज (सोमवारी) सकाळी ८ वाजता अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार, बुवाबाजी संघर्ष समितीचे सचिव भगवान रणदिवे, सीताराम चाळके, किशोर ननावरे, संध्या जाधव, छकुताई देटे यांनी पोलिसांसह तिला रंगेहाथ पकडले़ या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश गर्जेंसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)

Web Title: Baker's boating exposed in Shankar temple