आविष्कार फाैंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:34 IST2021-01-18T04:34:49+5:302021-01-18T04:34:49+5:30

वाई : आविष्कार फाैंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत देण्यात येणारा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य जोतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वाई तालुक्यातील तानाजी कुंभार ...

Awarding state level award of Avishkar Foundation | आविष्कार फाैंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

आविष्कार फाैंडेशनचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

वाई : आविष्कार फाैंडेशन कोल्हापूर यांच्यामार्फत देण्यात येणारा राज्यस्तरीय क्रांतिसूर्य जोतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वाई तालुक्यातील तानाजी कुंभार व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार सुरेखा कुंभार, दीपा सपकाळ सटालेवाडी व छाया जावळे या शिक्षकांना प्रदान करण्यात आला.

गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथे झालेल्या कार्यक्रमात आविष्कार फाैंडेशनचे अध्यक्ष संजय पवार, साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे, ‘डायट’चे अधिव्याख्याता रमेश कोरे, कवी शाम कुरळे आदी मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम झाला.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य व राजकीय क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीची तालुका कार्यकारिणीमार्फत निवड करून हा राज्यस्तरीय पुरस्कार दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी प्रदान करण्यात येतो. या यशाबद्दल सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे पदाधिकारी, अधिकारी, आविष्कार फाैंडेशन तालुका कार्यकारिणी, शिक्षक संघटना, ग्रामस्थ व मित्रमंडळींनी कौतुक केले.

Web Title: Awarding state level award of Avishkar Foundation