मित्रांमध्ये झालेली भांडणे मिटवून घरी परताना दोघांवर हल्ला, सैदापूरजवळील घटना; चौघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 17:17 IST2022-04-28T17:16:01+5:302022-04-28T17:17:04+5:30

मित्रांमध्ये झालेली भांडणे मिटवून घरी परतत असताना दोघा तरुणांवर चार जणांनी हल्ला केला.

Attack on the two while returning home after settling the quarrel between friends, incident near Saidapur | मित्रांमध्ये झालेली भांडणे मिटवून घरी परताना दोघांवर हल्ला, सैदापूरजवळील घटना; चौघांवर गुन्हा

मित्रांमध्ये झालेली भांडणे मिटवून घरी परताना दोघांवर हल्ला, सैदापूरजवळील घटना; चौघांवर गुन्हा

सातारा : मित्रांमध्ये झालेली भांडणे मिटवून घरी परतत असताना दोघा तरुणांवर चार जणांनी हल्ला केला. सैदापूर, ता. सातारा येथे मंगळवारी (दि. २६) ही घटना घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. श्रेयस भोसले, श्रेयस देशमुख, साहिल भोसले, अमर पवार (फिर्यादीला पत्ते माहीत नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यशराज दीपक माने (वय २१, रा. चाहूर पिरवाडी, कृष्णानगर) हा त्याचा मित्र संकेत चव्हाण तसेच प्रतीक बाबर हे मित्र रोहित रसाळ याच्यासोबत झालेली जुनी भांडणे मिटविण्यासाठी तामजाइनगर येथे गेले होते. वाद मिटवून हे सर्वजण परत येत होते. त्यावेळी सैदापूर येथील एका ढाब्याजवळ पाठीमागून येऊन वरील संशयितांनी यशराज मानेवर लाकडी दांडक्याने हल्ला केला.

श्रेयस भोसले याने माने याच्या उजव्या हातावर दांडक्याने मारले तर इतर संशयितांनी त्याचे मित्र संकेत चव्हाण याला हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संशयित तेथून पसार झाले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Attack on the two while returning home after settling the quarrel between friends, incident near Saidapur