साताऱ्यात काकाचा पुतणीवर अत्याचार, पीडित गर्भवती राहिल्याने समोर आला प्रकार

By दत्ता यादव | Updated: December 2, 2023 16:19 IST2023-12-02T16:15:49+5:302023-12-02T16:19:57+5:30

सातारा : एका १७ वर्षीय पुतणीवर वारंवार अत्याचार करून तिला गरोदर ठेवल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात काकावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला. ही घटना जून २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडली. याबाबत पोलिसांनी ...

Atrocities of uncle on nephew in Satara, The incident came to light when the victim was pregnant | साताऱ्यात काकाचा पुतणीवर अत्याचार, पीडित गर्भवती राहिल्याने समोर आला प्रकार

साताऱ्यात काकाचा पुतणीवर अत्याचार, पीडित गर्भवती राहिल्याने समोर आला प्रकार

सातारा : एका १७ वर्षीय पुतणीवर वारंवार अत्याचार करून तिला गरोदर ठेवल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात काकावर पोक्सोचा गुन्हा दाखल झाला. ही घटना जून २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित तरुणी सातारा शहरात वास्तव्यास आहे. पीडितेच्या चुलत काकाने राहत्या घरात कोणी नसताना पीडितेवर अत्याचार केला. तसेच शेतातही नेऊन त्याने अत्याचार केला. त्यातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. हा प्रकार तू कोणाला सांगितलास तर तूला मारून टाकीन, तुमचे घर जाळून टाकेन, अशी त्याने धमकी दिली. त्यामुळे तरुणीने हा प्रकार काही दिवस घरात कोणाला सांगितला नव्हता. 

मात्र, गरोदर झाल्याचे समजल्यानंतर तिने हा प्रकार घरात सांगितला. त्यानंतर घरातल्यांनी तरुणीला घेऊन सातारा शहर पोलिस ठाणे गाठले. शुक्रवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात चुलत काकाच्याविरोधात पीडित तरुणीने तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Atrocities of uncle on nephew in Satara, The incident came to light when the victim was pregnant