शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊन वाढवतोय अंगणवाडी ताईंचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : संपूर्ण राज्यभरात अंगणवाडीचा कारभार पारदर्शक करण्यात आला आहे. या नवीन मोहिमेच्या माध्यमातून अंगणवाडी ताईंना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : संपूर्ण राज्यभरात अंगणवाडीचा कारभार पारदर्शक करण्यात आला आहे. या नवीन मोहिमेच्या माध्यमातून अंगणवाडी ताईंना थेट स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रशिक्षणही पार पडले, मात्र, या मोबाईलवर माहिती भरल्यानंतरही संबंधित विभागापर्यंत माहिती पोहोचत नसल्याने अंगणवाडी ताईंची डोकेदुखी वाढली आहे.

जिल्ह्यात ४ हजार ८१० अंगणवाड्या बाहेत. त्यामध्ये तीन लाखाहून अधिक लाभार्थी आहेत. त्यांचा आहार वितरित करण्यापासून ते प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी अंगणवाडी ताईंवर आहे. मात्र, तक्रारी अधिक असल्याने त्यांना स्मार्ट फोन देण्यात आला आहे. स्मार्ट फोनवर रोज उपस्थित विद्यार्थ्यांचा फोटो टाकायचा आहे. याशिवाय आहार वाटपाची माहिती आणि लाभार्थींचा फोटोही टाकावा लागतो. ऑनलाईन कामकाजानंतरच अंगणवाडी ताईंची उपस्थिती आणि वेतन निश्चित होते. मात्र, सर्व्हरमुळे संपूर्ण ऑनलाईन कामकाज ठप्प झाले आहे. त्याला पर्याय म्हणून ऑफलाईन काम करावे लागत आहे. या कामाच्या वाढत्या व्यापाने अंगणवाडी ताईंची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे प्रशासनाला कामकाज करताना अडथळे येत आहेत.

अडचणी काय!

अंगणवाडीचा कारभार पारदर्शक करण्यासाठी अंगणवाडी ताईंना मोबाईलचे वाटप करण्यात आले. या मोबाईलमध्ये संपूर्ण माहिती भरणे अपेक्षित होते. त्यानुसार माहिती मोबाईलमध्ये डाऊनलोड होते. मात्र, संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचतच नाही.

कामकाज सुधारणार

अंगणवाडी ताईंना मोबाईल देण्यात आले आहेत. त्यावरच शासकीय कामकाज पार पाडले जाते. मात्र, सध्या सर्व्हरचे काम सुरू असल्याने माहिती अपलोड होत नाही. हे कामकाज सुधारण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

- मनोज ससे,

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण

मोबाईलवरून कोणती कामे करावी लागतात...

अंगणवाडीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविणे

आहार वाटपाची माहिती अद्यावत भरणे

माता बैठक आणि समुपदेशनाची माहिती भरणे

बालकांचे वजन आणि गरोदर मातांचे वजन भरणे

लाभार्थ्यांच्या घरी भेटी देणे

गरोदर मातांच्या लसीकरणाची माहिती देणे

संभाव्य बाळंतपणाच्या तारखा दाखल करणे

गावातील सर्वेक्षण नोंद करणे

महिलांच्या आरोग्याच्या तपासण्यांची माहिती दाखल करणे

विद्यार्थ्यांचे फोटो रोजच्या हजेरीपटासह पाठविणे

दिवसभरातील कामकाजाचे नियोजन पाठविणे

पॉईंटर

४८१० जिल्ह्यातील अंगणवाड्या

४८१० अंगणवाडी सेविका

४८१० मोबाईलचे वाटप