शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अंगापूर, कोडाेलीत गैरव्यवहाराचा आरोप असलेले रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:43 IST

सातारा : अंगापूर, कोडोलीमध्ये गैरव्यवहारांचे आरोप असलेले निवडणूक रिंगणात उतरले असून ते ‘मी पुन्हा येईन’च्या वल्गना करत आहेत, असा ...

सातारा : अंगापूर, कोडोलीमध्ये गैरव्यवहारांचे आरोप असलेले निवडणूक रिंगणात उतरले असून ते ‘मी पुन्हा येईन’च्या वल्गना करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी केला आहे.

ग्रामीण भागाच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ग्रामपंचायती हा गावाचा कणा आहेत, अशा ग्रामपंचायतींमध्ये स्वत: सत्ता उपभोगून, त्याद्वारे गैरव्यवहार करून गावाला लुटणारे आता पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सातारा तालुक्यातील अंगापूर आणि कोडोलीमध्ये तसे चित्र स्पष्ट दिसत असून, गैरव्यवहारांचे सूत्रधार आता निवडणुकीद्वारे ‘मी पुन्हा येईन... मी पुन्हा येईन’ अशा वल्गना करत आहेत. सामान्य मतदारांनी याबाबत वस्तुस्थितीची माहिती घ्यावी आणि त्यांना थेट मतपेटीतून धडा शिकवावा, असे आवाहन श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी केले आहे.

कोडोलीचा विषय तर फार वेगळाच आहे, असे म्हणावे लागणार आहे. ज्यांना जनतेने खुल्या मनाने निवडून दिले, ज्यांनी गावाचा विकास साधायचा होता, त्यांनी ग्रामपंचायतीला लुटण्याचे काम केले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्येदेखील कोडोलीच्या विषयाने गदारोळ केला होता. कोडोलीमध्ये सरपंच, उपसरपंच व अन्य दोन सदस्यांनी आर्थिक गैरव्यवहार केला असल्याचे समोर आल्यानंतर पुणे विभागीय आयुक्तांनी २४ फेब्रुवारी २०२० रोजी एक आदेश काढून, या मंडळींना पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले होते. सहा वर्षे जर आपण थांबलो तर आपला स्वत:चा आणि बगलबच्चांचा कसा विकास होणार, या भीतीने राजकीय कुरघोड्या करत या मंडळींनी ६ मार्च २०२० रोजी मंत्रालयातून आपल्यावरील कारवाईला स्थगिती मिळवली होती. ही स्थगिती देत असतानाच ११ मार्च २०२० रोजी वरील विषयांची सुनावणी पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत, असे ग्रामविकासमंत्र्यांनी स्पष्ट निर्देशदेखील दिले होते, असेही चोरगे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

चौकट

न्यायालयात दाद मागणार

या निवडणुकीच्या माध्यमातून आरोप असलेले लोक जरी विजयी झाले तरी आम्ही न्यायालयात याविषयी निश्‍चित दाद मागणार आहोत. ज्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत, त्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढणार असून, न्यायालयाच्या आदेशाद्वारे आम्ही या मंडळींना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवू, असा विश्‍वास श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी व्यक्त केला. राजकीय आश्रय मिळाला म्हणजे जिंकलो असे नाही, तर जनतेच्या न्यायालयात त्यांना आपली जागा कळून येईल, असेही श्यामराव चोरगे व डॉ. विक्रम कणसे यांनी नमूद केले.