शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

औंधमध्ये प्राचीन, अर्वाचीन नाणी प्रदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST

औंध : औंध येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त किमान २६०० वर्षांपूर्वीची प्राचीन व अर्वाचीन दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन दि. १७ ...

औंध : औंध येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त किमान २६०० वर्षांपूर्वीची प्राचीन व अर्वाचीन दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन दि. १७ व १८ फेब्रुवारी रोजी औंध येथे भरविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष नीलेश खैरमोडे यांनी दिली.

शिवसंकल्प प्रतिष्ठानकडून नेहमीच विधायक कार्यक्रम राबविले जातात. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, पशु-पक्ष्यांच्या अन्न-पाण्याची सोय... असे विविध प्रकारचे कार्यक्रम राबविले जातात. यंदा शिवजयंती उत्सवानिमित्त हजारो वर्षांपूर्वीचा वैभवशाली इतिहास प्रत्यक्ष पाहायला व अनुभवायला मिळणार आहे. दुर्मिळ नाण्यांच्या प्रदर्शनात शक, कुषाण, सातवाहन, यादव, चालुक्य, शुंग, मौर्य, मराठा या पराक्रमी वंशातील अनेक सम्राटांची नाणी, तसेच मुघल, निजाम, ब्रिटिश व इतर मुस्लिम राज्यकर्त्यांची नाणीही पाहायला मिळणार आहेत. तसेच चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, अकबर, औरंगजेब, शहाजहान, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज यांच्या काळातील नाणी या प्रदर्शनात पाहायला मिळतील. तरी औंध पंचक्रोशीतील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

फोटो आहे.. १६औंध०१

औंध येथे शिवसंकल्प प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त किमान २६०० वर्षांपूर्वीच्या प्राचीन व अर्वाचीन दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.