साताऱ्यात राजवाड्याजवळ बेवारस मृतदेह आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 14:37 IST2022-07-14T14:37:06+5:302022-07-14T14:37:25+5:30
सातारा : येथील राजवाड्याजवळ आज, गुरुवारी सकाळी एका ५० ते ६० वर्षीय पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर ...

साताऱ्यात राजवाड्याजवळ बेवारस मृतदेह आढळला
सातारा : येथील राजवाड्याजवळ आज, गुरुवारी सकाळी एका ५० ते ६० वर्षीय पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
राजवाड्याजवळील नगर वाचनालयाजवळ असणाऱ्या एका दुकानासमोर संबंधित व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. संबंधिताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नातेवाइकांना बोलावले असून, अदयाप त्यांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.