अमित शाह यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील विधान दुर्दैवी - पृथ्वीराज चव्हाण

By प्रमोद सुकरे | Updated: December 18, 2024 19:20 IST2024-12-18T19:19:39+5:302024-12-18T19:20:45+5:30

'भाजपाला देशात पुन्हा वर्णव्यवस्था आणायचीय'

Amit Shah statement regarding Dr. Babasaheb Ambedkar is unfortunate says Prithviraj Chavan | अमित शाह यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील विधान दुर्दैवी - पृथ्वीराज चव्हाण

अमित शाह यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील विधान दुर्दैवी - पृथ्वीराज चव्हाण

कराड : केंद्रीय मंत्री अमित शहा याचे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातील विधान हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरएसएस  वाल्यांच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल किती द्वेषपूर्ण भावना भरलेली आहे, याचेच त्यातून प्रदर्शन झाले असून उद्या गुरुवारी १९ रोजी काँग्रेस त्याच्या निषेधार्थ जाहीर आंदोलन करणार आहे. असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कायमच विरोध केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, भाजपाने वैचारिक हल्ला करावा. मात्र, द्वेषपूर्ण वक्तव्य करून समाजात विभाजन करण्याची भाजपाची प्रवृत्ती असून लोकसभेला मोदींनी मुस्लिम समाजाला टार्गेट केले होते. भाजपाला या देशात पुन्हा वर्णव्यवस्था आणायची असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली. 

राज्यातील निवडणुका होऊन महिना संपत आले तरी खातेवाटप झालेले नाही. याबाबत विचाताच चव्हाण म्हणाले की, सध्याचे सरकार सत्तेची वाटणी आणि राज्याचा खजिना लुटण्याकरता तयार झाले आहे. राज्यात सत्तेची साठेमारी चालू असून अतिशय यश मिळाल्याने ते पचवणे त्यांना अवघड जात आहे. 

बेळगाव येथे २६ व २७ डिसेंबरला काँग्रेसचे अधिवेशन

अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने २६ व २७ डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे अधिवेशन घेतले आहे. महात्मा गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती त्याला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होणार आहे. २६ रोजी बैठक व २७ रोजी जाहीर अधिवेशन होणार आहे. त्याला देशातील काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Amit Shah statement regarding Dr. Babasaheb Ambedkar is unfortunate says Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.