शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

आकाशाला भिडणारा अजस्त्र संडे १ सुळका ज्ञानदा कदमने केला सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 1:31 PM

विशेष बाब म्हणजे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असणारा नजर टाकली तरी धडकी भरवणारा प्रत्येक ट्रेकर्सना आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला उंच वजीर सुळका सुद्धा ती लवकरच सर करणार आहे.

लखन नाळेवाठार निंबाळकरसह्याद्री रांगेतील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील आकाशाला भिडणारा अजस्त्र संडे १ सुळका ज्ञानदा सचिन कदम हिने सर केला. रविवारी दि. २८ नोव्हेबर २०२१ रोजी होणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या रिव्हर सायक्लोथॉन मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन तिने केले.ज्ञानदा सचिन कदम असे या चिमुरडीचे नाव. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वारुगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गिरवी हे तिचे मूळ गाव. मुळातच गडकोटांच्या कुशीत जन्म असणाऱ्या या चिमुरडीला त्याबद्दलची आवड व कुतूहल नसेल तर नवलच .तिच्यातील ही आवड ओळखून तिच्या आईवडिलांनी तिला ट्रेकिंग आणि सायकलिंग साठी प्रोत्साहन दिले. व तिच्या गोष्टींमध्ये खंड पडू दिला नाही . अगदी लहान वयातच वडिलांची जन्मभूमी असणाऱ्या गिरवी पासून सुरू होणारा किल्ले वारुगड यशस्वीरित्या सर केला आणि तिथून पुढच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.ज्ञानदाने २६ जानेवारी २०१९ ला प्रतापगड किल्ला सर केला. तर १३ डिसेंबर २०२० रोजी मुरलेल्या ट्रेकर्सना सुद्धा घाम फोडणारा किल्ले वासोट्याचा अवघड जंगल ट्रेक पूर्ण केला. तिने तिच्या ६ व्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईच्या संकल्पनेतून जानेवारी २०२१ मध्ये ६ किल्ले एका महिन्यात यशस्वीरित्या सर केले . या सहा किल्ल्यांच्या मालिकेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे केली. नंतर स्वराज्याचे तोरण तोरणा, गडांचा राजा अन राजेंचा गड राजगड, तानाजी मालुसरेंच्या रक्ताने पावन झालेला किल्ले सिंहगड, स्वराज्याची राजधानी रायगड, किल्ले लोहगड अशा पद्धतीने किल्ल्यांच्या ट्रेकिंग ची मालिका सुरु झाली व आज तगायत ती सुरूच आहे.कलावंतीण दुर्ग, किल्ले प्रबळगड व किल्ले पुरंदर हे ही तिने सर केले आहेत. नुकताच १४ नोव्हेंबर २०२१ रोजी बाल दिनाचे औचित्य साधून जीवधन किल्ल्याचा ट्रेक पूर्ण केला. याचबरोबर दिघी, दत्तगड, घोराडेश्वर, कडेपठार असे अनेक डोंगर तिने सर केले. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सुद्धा तिने सर केले आहे. विशेष बाब म्हणजे प्रत्येक ट्रेकरचे स्वप्न असणारा नजर टाकली तरी धडकी भरवणारा प्रत्येक ट्रेकर्सना आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला उंच वजीर सुळका सुद्धा ती लवकरच सर करणार आहे.जेव्हा तिला गोल्डन मॅन नीरज चोप्रा यांनी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवले हे सांगितले. तेव्हा मी सुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा असा ठाम निर्धार तिने बोलून दाखवला

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNashikनाशिकTrekkingट्रेकिंग