Satara: गुणवत्ता अहवाल विरोधात न देण्यासाठी ५० हजारांची घेतली लाच, कृषी अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:38 IST2026-03-24T17:38:30+5:302026-03-24T17:38:45+5:30

तक्रारदाराकडे ८० हजारांची लाच मागितली

Agriculture officer arrested in Satara while accepting a bribe of Rs 50000 for not submitting quality report | Satara: गुणवत्ता अहवाल विरोधात न देण्यासाठी ५० हजारांची घेतली लाच, कृषी अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

Satara: गुणवत्ता अहवाल विरोधात न देण्यासाठी ५० हजारांची घेतली लाच, कृषी अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

सातारा : खते व औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करून गुणवत्ता अहवाल विरोधात न देण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना कृषी अधिकारी गुणनियंत्रक युवराज अन्याबा काटे (वय ५४, रा. कृष्णानगर, सातारा) याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई सातारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी करण्यात आली.

संबंधित तक्रारदाराची खते व औषधे उत्पादित करणारी कृषीची कंपनी असून, कंपनीत तयार झालेली खते व औषध तयार झाल्यानंतर त्याची तपासणी तालुका कृषी विभागाकडील गुणनियंत्रण विभागाकडून करण्यात येते. तक्रारदार यांनी सातारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन तपासणीची मागणी केली. त्यावेळी कृषी अधिकारी युवराज काटे याने गुणवत्ता अहवाल विरोधात न देण्यासाठी तक्रारदाराकडे ८० हजारांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे रीतसर लेखी तक्रार केली. 

लाचलुचपतच्या विभागाने पडताळणी केली असता काटे हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, सातारा तालुका कृषी कार्यालयात सोमवारी दुपारी सापळा लावण्यात आला. या सापळ्यात कृषी अधिकारी युवराज काटे हा ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुप्रिया गावडे, हवालदार गणेश ताटे, नीलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे, अजयराज देशमुख, सागर कदम, सत्यम थोरात आदींनी केली.

Web Title : सतारा: गुणवत्ता रिपोर्ट के लिए रिश्वत लेते कृषि अधिकारी रंगेहाथ गिरफ्तार

Web Summary : सतारा में, एक कृषि अधिकारी को 50,000 रुपये की रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया गया। उन्होंने एक उर्वरक और दवा कंपनी के लिए अनुकूल गुणवत्ता रिपोर्ट प्रदान करने के लिए पैसे की मांग की। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो के अधिकारियों ने उसे सतारा तालुका कृषि कार्यालय में रंगेहाथ पकड़ा।

Web Title : Satara: Agriculture Officer Caught Red-Handed Taking Bribe for Favorable Report

Web Summary : In Satara, an agriculture officer was arrested for accepting a 50,000 rupee bribe. He demanded money to provide a favorable quality report for a fertilizer and medicine company. Anti-Corruption Bureau officers caught him red-handed at the Satara Taluka Agriculture Office.