कऱ्हाडात वीज वितरणचे कर्मचारी आक्रमक, कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:33 IST2019-01-07T13:32:22+5:302019-01-07T13:33:34+5:30
राज्य शासन वीज ग्राहक व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नुकसान करून खासगी कंपन्यांना फायदा करणारे धोरण राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप करत वीज वितरण कंपनीतील कर्मचारी व अभियंत्यांच्या सहा संघटनांच्या कृती समितीने सोमवारी कामबंद आंदोलन सुरू केले. कऱ्हाडमध्ये वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता कार्यालयाबाहेर घोषणाबाजीही केली.

कऱ्हाडात वीज वितरणचे कर्मचारी आक्रमक, कामबंद आंदोलन
कऱ्हाड : राज्य शासन वीज ग्राहक व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नुकसान करून खासगी कंपन्यांना फायदा करणारे धोरण राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप करत वीज वितरण कंपनीतील कर्मचारी व अभियंत्यांच्या सहा संघटनांच्या कृती समितीने सोमवारी कामबंद आंदोलन सुरू केले. कऱ्हाडमध्ये वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता कार्यालयाबाहेर घोषणाबाजीही केली.
यावेळी तांत्रिक कामगार युनियनचे राम चव्हाण, एसइइचे बाबासाहेब पवार, वर्कर्स फेडरेशनचे शौकत शेख, कामगार महासंघाचे अमोल जाधव, इंटकचे शरद पाटील, सहाय्यक कार्यकारी अभियंता अजित नवाळे, सहायक अभियंता तुषार खराडे, सचिन माळी, श्रीरंग शिंदे, सारंग सुतार उपस्थित होते.
महावितरण कंपनीतील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचविलेल्या सुचनांचा अंतर्भाव करून करावी, स्टाफ सेटअप करताना आधीची मंजूर पदे कमी न करता अंमलात आणावीत, महावितरण कंपनीच्या खासगीकरणाचा घाट थांबवावा आदींसह अनेक मागण्यांसाठी विज वितरण कंपनीच्या कऱ्हाड तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.