प्रशासनाने संचारबंदी कडक राबवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST2021-04-02T04:40:46+5:302021-04-02T04:40:46+5:30
वाई : प्रशासनाची ढिलाई, नागरिक व व्यापाऱ्यांकडून नियमांची होणारी पायमल्ली तसेच मुंबई-पुणे व परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे वाई, खंडाळा आणि ...

प्रशासनाने संचारबंदी कडक राबवावी
वाई : प्रशासनाची ढिलाई, नागरिक व व्यापाऱ्यांकडून नियमांची होणारी पायमल्ली तसेच मुंबई-पुणे व परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांच्या ग्रामीण भागातीलही कोरोनाचा वाढता आकडा चिंताजनक आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना बाधित गावांमध्ये संचारबंदी कडक राबवावी,’ अशी स्पष्ट सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केली.
वाई नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आमदार मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, वाईचे तहसीलदार रणजित भोसले, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, महाबळेश्वर तहसीलदार सुषमा पाटील, वाईचे गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, महाबळेश्वर गटविकास अधिकारी घोलप, खंडाळा गटविकास अधिकारी बिचुकले, वाई पालिकेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव, वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे आदी उपस्थित होते.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बेशिस्त, शासन नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई न केल्यास गंभीर परिस्थितीला सामोर जावे लागेल. तसेच वाई, शिरवळ, खंडाळा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी कंटेनमेन्ट झोनमधील कामगारांना उपस्थिती विषयी सक्ती करू नये. कोरोना पार्श्वभूमीवर टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे. तसेच लस घेतलेल्या नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे.
चौकट :
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती...
प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाची माहिती देत काही सूचना मांडल्या.
फोटो दि.३०वाई मकरंद पाटील फोटो...
फोटो ओळ : वाई येथील कोरोना बैठकीत आमदार मकरंद पाटील यांनी मार्गदर्शन केले. (छाया : पांडुरंग भिलारे)