संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील बबन भरगुडे यांचा प्रशासनाला विसर, पळशीत स्मारक उभारण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:13 IST2025-11-24T17:12:36+5:302025-11-24T17:13:47+5:30

प्रशासकीय इमारतीमध्ये हुतात्मा बबन भरगुडे यांचा फोटो असलेली फ्रेम अडगळीत असल्याचेही निदर्शनास आले

Administration forgets Baban Bhargude of the Samyukta Maharashtra movement, demands construction of a memorial in Palashi | संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील बबन भरगुडे यांचा प्रशासनाला विसर, पळशीत स्मारक उभारण्याची मागणी

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील बबन भरगुडे यांचा प्रशासनाला विसर, पळशीत स्मारक उभारण्याची मागणी

मुराद पटेल

शिरवळ : राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिल्यानंतर २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी हुतात्मा स्मृतिदिन साजरा केला जातो. मात्र, पळशीतील हुतात्मा बबन भरगुडे यांचा प्रशासनाला विसर पडला आहे. ६९ वर्षांमध्ये एकानेही अभिवादन करण्याची तसदी घेतलेली नाही. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत माहिती अशी की, २१ नोव्हेंबर १९५६ ते १ मे १९६० या काळात राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला. यानंतर मुंबईमधील संघटित कामगार व मराठी भाषिकांसहित मोर्चा काढला. फ्लोरा फाउंटेन परिसरात आला असता तणावाचे वातावरण पसरले होते. या आंदोलनात तब्बल १०७ हुतात्म्यांनी बलिदान देत महाराष्ट्राला १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना तत्कालीन सरकारला करावी लागली. १०७ हुतात्म्यांनी जीवाची बाजी लावली त्याठिकाणी १९६५ मध्ये उभारलेले हुतात्मा स्मारक आजही या लढ्याची साक्ष देत आहे. 
यामध्ये खंडाळा तालुक्यातील पळशीचे सुपुत्र बबन बापू भरगुडे यांनी बलिदान दिले.

मात्र, यानंतर तब्बल ६९ वर्षे प्रशासनासह लोकप्रतिनिधींना त्यांची आठवण आलेली नाही. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे सहकाऱ्यांसमवेत शिरवळ येथे भूमिपूजनाला आले. दुसरीकडे शिरवळपासून केवळ एक ते दोन किलोमीटरवर असणाऱ्या पळशी याठिकाणी जाऊन हुतात्मा भरगुडे यांना हुतात्मा दिनाचे औचित्य साधून अभिवादन करण्याची त्यांनी तसदी घेतली नाही. याबाबत गटविकास अधिकारी वाघमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

प्रतिमाही अडगळीत

विशेष म्हणजे, प्रशासकीय कारभार हाकणाऱ्या एका प्रशासकीय इमारतीमध्ये हुतात्मा बबन भरगुडे यांचा फोटो असलेली फ्रेम अडगळीत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

पळशीचे सुपुत्र हुतात्मा बबन भरगुडे यांचे कार्य खंडाळा तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करणारा व आजच्या पिढीला आदर्शवत असे स्मारक व स्वागत कमान उभारल्यास त्यांच्या कार्याचा उचित सन्मान होईल. याकरिता पळशी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठरावही घेतला असताना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. - नवनाथ भरगुडे, ग्रामपंचायत सदस्य, पळशी

Web Title : भुला दिए गए हीरो: पलशी में बबन भारगुडे स्मारक की मांग

Web Summary : संयुक्त महाराष्ट्र आंदोलन के शहीद बबन भारगुडे को प्रशासन ने भुला दिया। 69 वर्षों बाद पलशी के ग्रामीणों ने स्मारक की मांग की, लापरवाही पर आक्रोश व्यक्त किया।

Web Title : Forgotten Hero: Demand for Baban Bhargude Memorial in Palshi

Web Summary : Baban Bhargude, a martyr of the Samyukta Maharashtra movement, is forgotten by administration. Palshi villagers demand a memorial after 69 years, expressing outrage at the neglect.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.