सातारा: मोका गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार आरोपी गजाआड, लोणंद पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काढला माग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 15:41 IST2022-11-19T15:40:33+5:302022-11-19T15:41:00+5:30
संतोष खरात लोणंद : गेले चार वर्षांपासून फरार असलेला मोका, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस लोणंद पोलिसांनी गजाआड केले. ...

सातारा: मोका गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार आरोपी गजाआड, लोणंद पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे काढला माग
संतोष खरात
लोणंद : गेले चार वर्षांपासून फरार असलेला मोका, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस लोणंद पोलिसांनी गजाआड केले. बापू कल्याण शिंदे (रा. सुरवडी, ता. फलटण) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, लोणंद व उपविभागातील फलटण ग्रामीण व खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरीच्या गंभीर घटना घडल्या होत्या. त्यामुळे संबंधित आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी दिल्या होत्या. लोणंद पोलिस ठाणे हद्दीत दि. ७ ऑक्टोबर रोजी जबरी चोरीचा गुन्हा घडला होता. या चोरीचा तपास करताना घटनास्थळापासून सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करत सुमारे ४७ किलोमीटर अंतरापर्यंत आरोपींचा माघ घेतला.
यावेळी फलटण उपविभागातील मोकाच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरारी असलेला मुख्य आरोपी बापू शिंदे हा साखरवाडी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. लोणंद पोलिस तसेच फलटण ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बापू शिंदे याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचे साथीदारांनी मिळून लोणंद, फलटण ग्रामीण व खंडाळा पोलीस स्टेशनचे हद्दीतील अनेक गुन्हे केल्याचे कबुली दिली. याप्रकरणी लोणंद पोलिस अधिक तपास करीत आहेत.