खंबाटकी घाटातील एस वळणावर पुन्हा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 13:56 IST2019-11-08T13:52:39+5:302019-11-08T13:56:00+5:30
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर भरधाव वाहनचालकाला एस वळणावर आपल्या वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने कंटेनर उलटला. या अपघातात चालक जखमी झाला असून, त्याच्यावर खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खंबाटकी घाटातील एस वळणावर पुन्हा अपघात
खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर भरधाव वाहनचालकाला एस वळणावर आपल्या वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने कंटेनर उलटला. या अपघातात चालक जखमी झाला असून, त्याच्यावर खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सांगलीहून मुंबईकडे जाणारा कंटेनर (एमएच ४६ एआर ४६४९) हा बोगदा ओलांडून येत असताना तीव्र उतारावर वाहनाचा वेग वाढल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर पुढे असणाऱ्या एस वळणावर पुलाच्या कठड्याला धडकून कंटेनर उलटला.
या अपघातात कंटेनर चालक सतेंदरकुमार श्रीराणा प्रतापसिंग (वय ३८, रा. उत्तर प्रदेश) हा डोक्याला आणि डाव्या हाताला मार लागून जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी घाटात धाव घेऊन जखमी चालकास खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.