Satara: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचा डाबर अचानक तुटला... ट्रॅक्टर पुलाच्या कठड्यावर चढला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:00 IST2025-12-06T17:59:10+5:302025-12-06T18:00:06+5:30

चालकाने दाखविले प्रसंगावधान : अनर्थ टळला

Accident involving a tractor transporting sugarcane on the Tulsan bridge between Ond Undale on the Karad Ratnagiri highway | Satara: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचा डाबर अचानक तुटला... ट्रॅक्टर पुलाच्या कठड्यावर चढला!

Satara: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीचा डाबर अचानक तुटला... ट्रॅक्टर पुलाच्या कठड्यावर चढला!

कराड : कराड-रत्नागिरी महामार्गावरील ओंड–उंडाळे दरम्यान असलेल्या तुळसण पुलावर शुक्रवारी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. अचानक पाठीमागील ट्रॉलीचा डाबर तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वेगात असलेला ट्रॅक्टर सरळ पुलाच्या कठड्यावर जाऊन अडकला. मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचा जीव शर्थीने वाचला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील अथणी शुगर्स-रयत युनिट सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा हा ट्रॅक्टर तुळसण पुलावर आल्यानंतर अचानक ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीचा डाबर तुटला. यामुळे धडधडत्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण मिळवण्यासाठी चालकाने प्रयत्न केले, परंतु तोपर्यंत ट्रॅक्टर पुलाच्या कठड्याला धडकून अर्धवट लटकलेल्या अवस्थेतच थांबला. काही क्षणातच अपघात एखाद्या थरारपटातील दृश्याप्रमाणे भीषण चित्र निर्माण करणारा ठरला.

दरम्यान, पुलाचा कठडा कोसळून ट्रॅक्टर व उसाने भरलेली ट्रॉली खाली सुमारे ५० ते ६० मीटर खोल असलेल्या ओढ्यात कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र ट्रॅक्टर कठड्यात अडकून राहिला आणि चालकाने शांतपणे बाहेर पडत स्वतःचा जीव शर्थीने वाचवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. या अपघातामुळे तुळसण पूल परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title : सतारा: गन्ने की ट्रॉली टूटी, ट्रैक्टर पुल से टकराया; ड्राइवर बचा!

Web Summary : सतारा में गन्ने से भरी ट्रैक्टर ट्रॉली का डाबर टूटने से ट्रैक्टर पुल के किनारे से टकरा गया। चालक बाल-बाल बच गया, जिससे नीचे घाटी में गिरने से हादसा टल गया। यातायात बाधित हुआ। कोई घायल नहीं हुआ।

Web Title : Satara: Sugarcane trolley breaks, tractor hits bridge; driver survives!

Web Summary : In Satara, a sugarcane tractor trolley detached, causing the tractor to crash into a bridge barrier. The driver narrowly escaped, avoiding a potential fall into the valley below. Traffic was briefly disrupted. No injuries were reported.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.