शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीस चौदा वर्षांनी अटक

By admin | Updated: January 20, 2015 00:03 IST

पाटण पोलीस गुजरातला : खूनप्रकरणी झाली होती जन्मठेपेची शिक्षा

कऱ्हाड : जन्मठेपेची शिक्षा भोगताना पॅरोल रजेवर कारागृहातून बाहेर आलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. तब्बल चौदा वर्षे तो पोलिसांच्या हाती लागला नाही. अखेर खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये पलायन केलेल्या त्या फरार आरोपीस रविवारी पाटण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आनंदा लक्ष्मण चोपडे (रा. डावरी, ता. पाटण) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा चोपडे याच्यासह अन्य काहीजणांनी १९९६ मध्ये जमिनीच्या वादातून आत्माराम सावळा चोपडे यांचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. या खटल्याच्या सुनावणीनंतर न्यायालयाने आनंदा चोपडे याला १९९९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. १९९९ ते २००२ पर्यंत आनंदा चोपडे कारागृहात होता. २००२ मध्ये तो पॅरोल रजेवर कारागृहातून बाहेर आला. मात्र, पॅरोल संपूनही तो परत कारागृहात गेला नाही. पोलिसांनी शोध घेतला असता तो फरार असल्याचे निष्पन्न झाले. गत चौदा वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, फरार आरोपी आनंदा चोपडे हा सुरत-गुजरातमध्ये सचिनगाव नावाच्या गावात वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास धस यांना मिळाली. निरीक्षक धस यांनी याबाबत पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे यांच्याशी चर्चा करून कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश गर्जे, पाटणचे हवालदार सुनील महाडिक, नाईक प्रवीण कोळी यांच्यासह पोलीस पथक गुजरातला पाठविले. पोलीस पथकाने रात्री आनंदा चोपडेला ताब्यात घेऊन अटक केली. (प्रतिनिधी)भांड्यांना कल्हई देण्याचा व्यवसायकारागृहातून पॅरोलवर बाहेर आल्यानंतर आनंदा चोपडे याने काही दिवसांतच पत्नीसह गुजरातला पलायन केले होते. गुजरातमधील सचिनगावमध्ये एका भाडेतत्त्वावरील खोलीत हे पती-पत्नी वास्तव्यास होते. गत अनेक वर्षांपासून त्याठिकाणी हे दाम्पत्य भांड्यांना कल्हई देण्याचा व्यवसाय करीत होते, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.