शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून क-हाडात शिवसैनिकांकडून अभिषेक अन् होमहवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 18:30 IST2019-11-11T18:29:50+5:302019-11-11T18:30:33+5:30

क-हाड येथे कृष्णा घाटावरील संगमेश्वर मंदिरात शिवसेनेचे शिवसैनिक प्रमोद वेरणेकर, कुलदीप जाधव आदींनी महादेवाच्या पिंडीस अभिषेक घातला.

Abhishek and Shiv Sena in K-bone to get Shiv Sena chief minister | शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून क-हाडात शिवसैनिकांकडून अभिषेक अन् होमहवन

शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून क-हाडात शिवसैनिकांकडून अभिषेक अन् होमहवन

ठळक मुद्देमहादेवाच्या पिंडीस अभिषेक घातला.

क-हाड : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होवो, यासाठी सोमवारी दुपारी एक वाजता क-हाड येथे कृष्णा घाटावरील संगमेश्वर मंदिरात शिवसेनेचे शिवसैनिक प्रमोद वेरणेकर, कुलदीप जाधव आदींनी महादेवाच्या पिंडीस अभिषेक घातला.

यावेळी शिवसेनेचे वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख दशरथ धोत्रे, क-हाड उपशहरप्रमुख कुलदीप जाधव, दिलीप यादव, विभागप्रमुख महेश कोळी, संरक्षण कक्ष उपजिल्हाप्रमुख राजेंद्र माने, शिवसैनिक संभाजी जगताप, विशाल देशपांडे, राजेंद्र माने, पोपटराव कांबळे, दिलीप यादव आदींसह महिला पदाधिकारी जिल्हा संघटिका अनिता जाधव, कलावती माळी, प्रतिभा नाईक, छायाताई गुरव, शोभा लोहार आदी उपस्थित होत्या. क-हाड येथील कृष्णा घाटावरील संगमेश्वर मंदिरात शिवसैनिकांकडून मंत्रोच्चार करत महादेव पिंडीस अभिषेक घातला. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Abhishek and Shiv Sena in K-bone to get Shiv Sena chief minister