अभेपुरीमध्ये जय अन् पराजय राष्ट्रवादीचाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:29 AM2021-02-22T04:29:52+5:302021-02-22T04:29:52+5:30

वाई : वाईच्या पश्चिम भागातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढतीमुळे लक्षवेधी निवडणूक ठरलेल्या अभेपुरी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे पश्चिम भागासह तालुक्याचे ...

In Abhepuri, victory and defeat belongs to the NCP. | अभेपुरीमध्ये जय अन् पराजय राष्ट्रवादीचाच..

अभेपुरीमध्ये जय अन् पराजय राष्ट्रवादीचाच..

Next

वाई : वाईच्या पश्चिम भागातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये चुरशीच्या लढतीमुळे लक्षवेधी निवडणूक ठरलेल्या अभेपुरी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे पश्चिम भागासह तालुक्याचे लक्ष होते. राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या अभेपुरी गावात राष्ट्रवादीमधीलच दोन गटांत चुरशीची लढत झाली. यामध्ये ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली.

ही निवडणूक ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून लढविण्यात आली. या निवडणुकीत पाच जागांवर बाजी मारून विजयाची मोहोर लावली. सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. सर्वांनुमते सरपंचपदी सारिका मांढरे व उपसरपंचपदी स्वप्नील पाचपुते, तर सदस्य म्हणून आप्पासोा मांढरे, विजय मांढरे, हेमा पवार हे निवडून आले. ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचाच झेंडा लागला आहे.

यावेळी पॅनेलप्रमुख अशोक मांढरे म्हणाले, ‘आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात आम्ही सर्वजण गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहू व सर्वांना एकत्र घेऊन गावाची प्रगती साधू. गावातील रखडलेली कामे पूर्ण करण्यावर विशेष भर राहील. गावामध्ये मूलभूत सुविधा जनहिताच्या योजना राबविण्याबरोबर सर्व घटकांचे सक्षमीकरण यावरही विशेष परिश्रम घेतले जाईल.’

यावेळी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

२१अभेपुरी

अभेपुरी ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: In Abhepuri, victory and defeat belongs to the NCP.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.