साताऱ्यात ॲपे रिक्षात तरुणाने घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 16:18 IST2022-07-16T16:18:00+5:302022-07-16T16:18:31+5:30
आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

साताऱ्यात ॲपे रिक्षात तरुणाने घेतला गळफास
सातारा : येथील प्रतापसिंहनगरात राहणाऱ्या धर्मा अशोक गवळी (वय १८) या तरुणाने त्याच्या तीन चाकी ॲपे रिक्षामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. ही घटना काल, शुक्रवारी उशिरा घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढे फाट्यापासून जवळच असलेल्या एका हाॅटेलच्या पाठीमागे धर्मा गवळी याने ॲपे रिक्षा उभी केली. त्या रिक्षामध्ये त्याने नायलाॅनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समोर आल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर धर्मा गवळीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
त्याने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप पुढे आले नसून, पोलीस त्याच्या घरातल्यांकडे तपास करीत आहेत. याबाबत गणेश विष्णू लांडगे (वय २९, रा. प्रतापसिंगनहर, सातारा) याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.