Satara: बंधाऱ्यावरुन चालत जाताना पाय घसरला, माणगंगा नदीत पळशीतील युवक बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 19:09 IST2025-05-28T19:08:07+5:302025-05-28T19:09:47+5:30

गढूळ पाण्यामुळे शोध कार्यात अडचणी 

A youth from Palashi drowned after slipping and falling while walking on the embankment of the Manganga river in Palashi Man taluka satara | Satara: बंधाऱ्यावरुन चालत जाताना पाय घसरला, माणगंगा नदीत पळशीतील युवक बुडाला

Satara: बंधाऱ्यावरुन चालत जाताना पाय घसरला, माणगंगा नदीत पळशीतील युवक बुडाला

शरद देवकुळे

पळशी: माण तालुक्यातील पळशी येथे माणगंगा नदीवरील बंधाऱ्यावरुन चालत येताना पाय घसरून पडल्याने पळशी येथील एक युवक बुडाला. पावसामुळे माणगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. ही घटना काल, मंगळवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास घडली. नवनाथ पाटोळे (वय २८) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. प्रशासनाकडून युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. 

माण तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी, नाले, तलाव भरून वाहू लागले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पळशी येथील जाशी मार्गावरील बंधारा पाण्याखाली गेला आहे. काल, मंगळवारी संध्याकाळी पळशी येथील युवक नवनाथ पाटोळे जाशी येथे जेवायला गेले होते. बंधाऱ्यावरून चालत येताना पाय घसरून नदीत पडल्याने तो बुडाले. 

ही घटना पळशी गावात कळताच अनेकांनी नदीकडे धाव घेत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसामुळे पाण्याचा वेग जास्त असल्याने ग्रामस्थांना अडचणी येत होत्या. आज, बुधवारी दुसऱ्या दिवशीही प्रशासनाकडून शोधमोहिम राबविली. घटनेची नोंद म्हसवड पोलिसात झाली आहे.

Web Title: A youth from Palashi drowned after slipping and falling while walking on the embankment of the Manganga river in Palashi Man taluka satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.