पार्टी बेतली जीवावर, पाणी आणायला गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, साताऱ्यातील सोनगाव येथील घटना

By दत्ता यादव | Updated: November 28, 2022 17:01 IST2022-11-28T17:00:45+5:302022-11-28T17:01:33+5:30

गावात सर्वत्र हळहळ

A young man died due to electric shock while fetching water from a well, The incident at Songaon in Satara | पार्टी बेतली जीवावर, पाणी आणायला गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, साताऱ्यातील सोनगाव येथील घटना

पार्टी बेतली जीवावर, पाणी आणायला गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, साताऱ्यातील सोनगाव येथील घटना

सातारा: मित्राबरोबर मसाले भाताची पार्टी करण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा विहिरीतून पाणी आणत असताना विजेचा धक्का लागून दुर्देवी मृत्यू झाला. यश गणेश चिकणे असे या मृत तरुणाचे नाव आहे. जावळी तालुक्यातील सोनगाव येथे ही घटना घडली. या घटनेची मेढा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यश चिकणे हा लहान भाऊ आयुष चिकणे यांच्यासह संकेत चिकणे, सत्याम चिकणे, विशाल पवार, कुणाल चिकणे  (सर्व रा. सोनगाव)  हे काल, रविवारी दुपारी मसाले भाताची पार्टी करण्यासाठी आर्डे नावाच्या शिवारात गेले होते. याठिकाणी शिवारात उमेश काटकर यांची विहीर आहे. मसाले भात करण्यासाठी याविहिरीतून यश पाणी आणण्यासाठी गेला.

विहिरीच्या लोखंडी गजाच्या पायरीवर गेला असता त्याला विजेचा धक्का लागून तो पाण्यात पडला. यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद किरण तुकाराम चिकणे यांनी मेढा पोलिस ठाण्यात दिली असून त्याचा अधिक तपास पोलिस नाईक शेख हे करीत आहेत.

Web Title: A young man died due to electric shock while fetching water from a well, The incident at Songaon in Satara