Satara: दोन वेळा उचकी लागली अन् तरुणाचा जीव गेला!; मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जमले होते एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:16 IST2025-06-19T19:16:00+5:302025-06-19T19:16:24+5:30

मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही

A young man died after suddenly suffering from hiccups while cooking for a friend's birthday party in satara | Satara: दोन वेळा उचकी लागली अन् तरुणाचा जीव गेला!; मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जमले होते एकत्र

संग्रहित छाया

सातारा : मित्राच्या वाढदिवसाचे जेवण बनविण्यासाठी कांदा कापत असताना अचानक ३० वर्षांच्या तरुणाला दोन वेळा उचकी लागली अन् यातच त्याचा जीव गेला. ही घटना मंगळवाली (दि. १७) सायंकाळी आंबेदरे (ता. सातारा) येथील स्वामी समर्थ मंदिराच्या समोरील टेकडीवर घडली.

अक्षय दत्तात्रय सुतार (वय ३०, रा. आकाशवाणी केंद्राजवळ, सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मित्राच्या वाढदिवसानिमित्त अक्षय सुतारसह चार-पाच मित्रांनी आंबेदरे येथील टेकडीवर पार्टीसाठी गेले होते. तेथे अक्षय हा कांदा कापत होता. त्यावेळी त्याला अचानक दोन वेळा उचकी लागली. त्यानंतर तो बेशुद्ध पडला. 

त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने शाहूपुरी येथील एका खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथून सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केल्याने मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: A young man died after suddenly suffering from hiccups while cooking for a friend's birthday party in satara