साताऱ्यात दुसऱ्या मजल्यावरुन पडून तरुण ठार, पोलिस तपास सुरु
By नितीन काळेल | Updated: August 4, 2023 12:53 IST2023-08-04T12:39:01+5:302023-08-04T12:53:15+5:30
सातारा : सातारा शहरातील शाहूनगरमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने तरुण ठार झाला. संबंधित तरुण पाटण तालुक्यातील असून याप्रकरणी शहर ...

साताऱ्यात दुसऱ्या मजल्यावरुन पडून तरुण ठार, पोलिस तपास सुरु
सातारा : सातारा शहरातील शाहूनगरमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडल्याने तरुण ठार झाला. संबंधित तरुण पाटण तालुक्यातील असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २ आॅगस्ट रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. शाहूनगरमधील एका अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरुन साहील रवींद्र सुतार (वय २३, रा. मुरुड, ता. पाटण) हा तरुण खाली पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सुवर्णा रवींद्र सुतार (रा. मुरुड) यांनी खबर दिली आहे. पोलिस इमारतीवरुन पडल्याच्या कारणाचा शोध घेत आहेत. तर याप्रकरणी हवालदार मोहिते हे तपास करीत आहेत.