Satara News: शेतात काम करताना वीज पडून महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:13 IST2026-03-31T16:13:06+5:302026-03-31T16:13:51+5:30

कराडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

A woman died after being struck by lightning while working in the field in Karadwadi Khandala taluka satara | Satara News: शेतात काम करताना वीज पडून महिलेचा मृत्यू

Satara News: शेतात काम करताना वीज पडून महिलेचा मृत्यू

लोणंद : खंडाळा तालुक्यातील कराडवाडी येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एका विवाहितेचा मृत्यू झाला आहे. ही घटना कराडवाडी (ता. खंडाळा) येथील ‘पांदी’ नावाच्या शिवारात घडली. सोनाली अजित कराडे (वय २८) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली कराडे या नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना सोमवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला. याच दरम्यान त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. 

घटनेनंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कराडवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे कराडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

Web Title : सतारा: खेत में काम करते समय बिजली गिरने से महिला की मौत

Web Summary : खंडाला के कराडवाड़ी में खेत में काम करते समय 28 वर्षीय सोनाली कराडे की बिजली गिरने से मौत हो गई। यह घटना अचानक बारिश और गरज के दौरान हुई। उन्हें तुरंत इलाज के लिए ले जाया गया लेकिन डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। इस त्रासदी से गांव में मातम छा गया है।

Web Title : Satara: Woman Dies After Being Struck by Lightning While Farming

Web Summary : In Karadwadi, Khandala, a 28-year-old woman, Sonali Karade, died after being struck by lightning while working in her field. The incident occurred during sudden rainfall and thunderstorms. She was immediately rushed for treatment but was declared dead by doctors. The tragedy has cast a pall of gloom over the village.