Satara: कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची पाठीमागून भीषण धडक, चालक गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 15:41 IST2025-07-25T15:40:02+5:302025-07-25T15:41:00+5:30

महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत अपघात

A container was hit from behind by another container near Gote village on the Pune Bengaluru highway the driver was seriously injured | Satara: कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची पाठीमागून भीषण धडक, चालक गंभीर जखमी 

Satara: कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची पाठीमागून भीषण धडक, चालक गंभीर जखमी 

मलकापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत गुरुवारी सकाळी साडेदहा वाजल्याच्या सुमारास अपघात झाला. अचानक ब्रेक मारल्यामुळे एका कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या कंटेनरची धडक झाली. या अपघातात पाठीमागील कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे.

अपघातस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर सातारा बाजूकडे जात होता. अचानक या कंटेनरच्या चालकाने ब्रेक लावल्यावर, सातारा दिशेने येणाऱ्या दुसऱ्या कंटेनर (नंबर प्लेट केए ५४ एजे ५०१०)ने त्याला पाठीमागून धडक दिली. या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, महादेव लावंड यांच्यासह कर्मचारी त्वरित अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताची तक्रार कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस उपनिरीक्षक भोईटे आणि कोळी तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमी चालकाला त्वरित रुग्णालयात दाखल केले गेले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

Web Title: A container was hit from behind by another container near Gote village on the Pune Bengaluru highway the driver was seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.