Satara Crime: एका बहिणीवर अत्याचार, दुसऱ्या बहिणीकडे मागणी; महाविद्यालयीन तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:50 IST2025-04-21T15:42:40+5:302025-04-21T15:50:30+5:30

मेढा : दहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर ...

A college boy raped a minor girl on the pretext of marriage in Medha Satara District | Satara Crime: एका बहिणीवर अत्याचार, दुसऱ्या बहिणीकडे मागणी; महाविद्यालयीन तरुणाला अटक

Satara Crime: एका बहिणीवर अत्याचार, दुसऱ्या बहिणीकडे मागणी; महाविद्यालयीन तरुणाला अटक

मेढा : दहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याची नजर तिच्या दुसऱ्या बहिणीवर गेली. तिनेही शरीरसुख द्यावे म्हणून दहावीतील मुलीला दमदाटी करून शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी मेढा पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना जावळी तालुक्यातील एका गावात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. ती शाळेत जात असताना एका महाविद्यालयीन तरुणाशी तिची ओळख झाली. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिला एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनंतर त्या तरुणाची नजर तिच्या बहिणीवर गेली. तिनेही शरीरसुख द्यावे म्हणून तो दहावीतील मुलीच्या मागे लागला. परंतु तिने नकार देताच त्या तरुणाने तिला दमदाटी करून शिवीगाळ केली. 

हा प्रकार असह्य झाल्याने पीडित मुलीने याची माहिती तिच्या आईला दिली. यानंतर आईने मेढा पोलिस ठाण्यात दि. १९ रोजी धाव घेऊन तक्रार दाखल केली. मेढा पोलिसांनी संबंधित तरुणावर पोक्साेचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी पाटील या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A college boy raped a minor girl on the pretext of marriage in Medha Satara District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.