महाविद्यालयासमोरील राड्याप्रकरणी १५ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 13:46 IST2022-02-11T13:45:58+5:302022-02-11T13:46:20+5:30

पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला आहे

A case has been registered against 15 persons in front of the college in satara | महाविद्यालयासमोरील राड्याप्रकरणी १५ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल 

महाविद्यालयासमोरील राड्याप्रकरणी १५ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल 

सातारा : येथील एका महाविद्यालय परिसरात सशस्त्र राडा घालत लेडिज शॉपीमध्ये घुसुन मारहाण आणि नुकसान केल्याप्रकरणात १५ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सोनाली संतोष पवार (रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर यश जांभळे (पूर्ण नाव नाही. रा. मंगळवार पेठ, सातारा) आणि अनोळखी १० ते १५ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. 

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास येथील एका महाविद्यालयाच्या परिसरात युवकांच्या दोन गटात राडा झाला होता. तसेच त्यावेळी संशयितांनी हातात धारदार शस्त्र घेऊन जवळच असलेल्या एका लेडिज शॉपीत प्रवेश केला. तेथील मुलांना मारहाण करुन बाहेर गेल्यावर दुकानाच्या काचेवर दगड मारला. यामध्ये दुकानाचे सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. 

याबाबत संबंधितांनी तक्रार दिल्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी संशयितांचा शोध सुरु केला आहे. हवालदार पोळ तपास करीत आहेत. 

Web Title: A case has been registered against 15 persons in front of the college in satara